Did you see this first song from upcoming movie ‘Muramba’

Muramba 1st song
वेब सीरिजच्या विश्वात चमकणारे मराठी तारे म्हणजे मिथिला पालकर आणि अमेय वाघ. सद्याच्या इंटरनेटच्या युगात त्यांचे अनेक फॅन्स आहेत. मिथिला आणि अमेय हे एकमेकांच्या प्रेमात आहेत असे देखील बोले जात आहे. सध्या अमेय वाघ ‘बॉयगिरी’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तर मिथिलाही ‘गर्ल इन द सिटी’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या पर्वातून झळकणार आहे. ‘मीरा सेहगल’ ही व्यकितरेखा ती साकारते आहे.

 

 

लवकरच या जोडीची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘मुरांबा’ असे असून या चित्रपटाने सोशल मीडिया वर भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे.प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाविषयी भरपूर उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण नार्वेकरने यांनी केले असून तरुणाईच्या जवळ जाणारं कथानक यात साकारल्याचं पाहायला मिळतंय.अमेय आणि मिथिला सोबत आपल्याला सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमित महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

 

 

नुकतच या चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘चाखायची घाई नको.. मुरु दे तर खरा.. मुरांबा’ असे हे गाणे आहे. या गाण्याच्या विडिओ मध्ये चित्रपटाच्या मेकिंगमधील काही क्षण आपल्याला पाहायला मिळतील. मिथिलाने तिच्या फेसबुकवरुन हे गाणे प्रसिद्ध केले. या विडिओ सोबत तिने लिहिलेल्या सुरेख कॅप्शनमुळे हा विडिओ आणिखीही विशेष झाला आहे. गायक जसराज जोशी यांनी त्यांच्या सुंदर आवाजात हे गाणे गायले आहे.

 

२ जूनला ‘मुरांबा’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला असून, या चित्रपटातील हे गाणे तुम्ही नक्की पहा !!

Leave a Reply

Your email address will not be published.