Savita Prabhune to play Lalit Prabhakar’s mother in this upcoming movie

Savita Prabhune 02

ललित प्रभाकरच्या आगामी चित्रपटात सविता प्रभुणे एका हळव्या आणि गोड आईच्या भूमिके आपल्याला पाह्यला मिळणार आहे. या आधीही अनेक मराठी व हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी प्रेमळ आईची भूमिका साकारली आहे. सविता प्रभुणे यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने मराठी तसेच हिंदी मालिका आणि चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

 

आईच्या भूमिकेला अत्यंत साजेश्या या अभिनेत्रीने कायमच प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. सविता प्रभुणे आता ललित प्रभाकर व नेहा महाजन यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव टी टी एम एम (तुझं तू माझं मी ) असा आहे. सविता प्रभुणे या आगामी चित्रपटात ललित प्रभाकरच्या आईची भूमिकेत आपल्या समोर येणार आहे. मोठ्या पडद्यावरील पहिल्यांदाच आई आणि मुलाच्या भूमिकेत सविता प्रभुणे व ललित प्रभाकर याना आपण पाहणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना हि आई आणि मुलाची भूमिका पाहण्याची उत्सुकता नक्कीच आहे. या आई-मुलाची बॉण्डिंग आणि केमिस्ट्री कश्या प्रकारे प्रेक्षकांना आवडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Savita Prabhune 01

ललित सोशल मीडियावर या चित्रपटाविषयी माहिती त्याच्या चाहत्यांना देत असतो. तसेच त्याचा आणखी एक चित्रपट ची व ची सौ का लवकरच प्रदर्शित होत असल्यामुळे सध्या तोच चर्चेत आहे. ललित प्रभाकरला मोठ्या स्क्रीन वर पाहण्यासाठी कमालीची उत्सुकता त्याच्या फॅन्स ला लागली आहे.तसेच TTMM (तुझं तू माझं मी) या चित्रपटाची विशेषतः म्हणजे नेहा महाजन आणि ललित प्रभाकर यांची हटके जोडी या सिनेमात झळकणार आहे. नेहा महाजन ला यापूर्वी यूथ,फ्रेन्ड्स, निळकंठ मास्तर यांसारख्या चित्रपटातून आपण पहिले आहे.

 

 

TTMM (तुझं तू माझं मी) हा चित्रपट येत्या १६ जुनला प्रदर्शित होणार आहे.

Savita Prabhune 03

Leave a Reply

Your email address will not be published.