Satish Rajwade’s ‘Pune Mumbai Pune’ will have its 3rd part coming soon

Pune mumbai Pune 3rd part 01

बॉलीवूडी तसेच हॉलिवूड मध्ये आपण पाहतो कि एखादा सिनेमा गाजला तर त्याचे सिक्वल हमखास बनवले जातात. जरी या सिक्वल ला फारसे यश मिळाले नाही तरी चित्रपट निर्माते सिक्वल बनवताना दिसतात. असाच काहीसा प्रयोग मराठी चित्रपट सृष्टीमध्ये साध्य पाहिलंय मेलणार आहे. ‘मुंबई- पुणे- मुंबई’ हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आठवत असेल. मुक्त बर्वे आणि स्वप्नील जोशी यांच्या प्रमुख भूमिका असेलेला आणि सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भरपूर यशस्वी झाला होता. या चित्रपटातील स्वप्नील व मुक्ता हि जोडी प्रेक्षकांना भरपूर आवडली होती व प्रेक्षकांचे हे प्रेम लक्षात घेऊन ‘मुंबई- पुणे- मुंबई’ या चित्रपटाचा दुसरा भाग बनवला गेला.

Pune mumbai Pune 3rd part 02

स्वप्नील व मुक्ता या जोडीला आपण अनेक मालिका व चित्रपतुन पाहिलं. ‘मुंबई- पुणे- मुंबई’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाइतकं यश दुसऱ्या भागाला मिळाला नाही तरी देखील या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या प्रेमामुळे बनवला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरु आहे. या चित्रपटाची शूटिंग काही महिन्यानंतर सुरु करण्यात येणार आहे.

 

 

Pune mumbai Pune 3rd part 03

मराठी चित्रपटसृष्टी मध्ये कोणत्याही सिनेमाचे तीन भाग आली नाही पण सतीश राजवाडे यांनी हा प्रयोग करण्याचा दमदार निश्चय केला आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातील कलाकार आपल्याला या तिसऱ्या भागामध्ये दिसणार आहेत व स्वप्निल आणि मुक्ता हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अगं बाई अरेच्चा या चित्रपटाचे सिक्वल म्हणून एकूण पाच चित्रपट काढणार अशी घोषणा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली होती. या चित्रपटाचे २ भाग प्रदर्शित झाली मात्र दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न्हवता यामुळे पुढील भाग अद्याप आलेले नाहीत. या वरून मराठी चित्रटपसृष्टीत सिक्वलची कल्पना लोकांना मात्र तितकी आवडली नाही असे म्हणता येईल.

 

‘मुंबई- पुणे- मुंबई’ हा चित्रपट २०१० मध्ये आला होता त्यानंतर ‘मुंबई- पुणे- मुंबई २’ हा या चित्रपटाचा दुसरा भाग २०१५ मध्ये आला. आता येणार तिसरा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.