Salman Khan announces the release date for this movie

सैराट स्टार आकाश ठोसर याची सध्या संपूर्ण चित्रपटसृष्टीत चर्चा होती. मागील वर्षी याच महिन्यात ‘सैराट’ चित्रपटाची सगळीकडे चर्चा होती. आजही सगळीकडे ‘सैराट’ ची गाणी लोक तितक्याच आवडीने गुणगुणताना दिसतात. सैराट’मधून चित्रपटसृष्टीला मिळालेला अनमोल अभिनेता म्हणजे आकाश ठोसर. आकाश वर्षभरानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एफयू’ (FU) या चित्रपटात आकाश मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Salman announces FU 04

खुद्द बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याने ‘एफयू’ चित्रपटाचा पहिला पोस्टर सोशल मीडिया वर प्रदर्शित केलायं. सुपरस्टार सलमान ने त्याच्या ट्विटरवर ‘एफयू’चा पोस्टर शेअर केला आहे. त्याच बरोबर त्याने आस लिहलंय की, ‘महेश मांजरेकरच्या ‘एफयू’मधून सैराट स्टार आकाश ठोसर परत येतोय….
सलमान ने शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये हाताची दोन बोटं स्टाईलमध्ये दाखविण्यात आली असून तो परत आलाय असे लिहिण्यात आले आहे. पुढे १४ एप्रिलला ११ वाजून ३५ मिनिटांनी त्याला भेटा असेही लिहलंय.

Salman announces FU 01

महेश मांजरेकर आणि सलमान हे फार जुने मित्र आहेत व चित्रपटसुर्ष्टी मध्ये त्यांची मैत्री प्रसिद्ध आहे . याचाच उधाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी मांजरेकरांच्या ‘रुबीक्स क्यूब’ या मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळ्या मध्ये सलमानने उपस्थिती लावली होती.
बऱ्याच दिवसांपासून ‘एफयू’ या चित्रपटाची चर्चा सोशल साइटवर रंगत आहे.आकाशने त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल साइटवर या चित्रपटाच्या शूटिंग
बद्दल फोटो त्याच्या चाहत्यांसाठी वेळोवेळी पोस्ट केल्या आहेत. ‘एफयू’ या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटात आकाश प्रमुख भूमिका साकारणार आहे . त्याच बरोबर त्याच्यासोबत महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, संस्कृती बालगुडे, माधुरी देसाई यांच्याही कलाकार झळकणार आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक तरूण कलाकारदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत यामध्ये माधव देवचक्के, मयुरेश पेम, मधुरा देशपांडे या कळकरणाचा समावेश आहे. येत्या २ जूनला ‘एफयू’ प्रदर्शित होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.