“Sairat did not awaken people”, Nagraj Manjule

Nagraj manjule Speech 03
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवले आहे. परश्या आणि आर्चीची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही . कुठेही जरी झिंगाट हे गाणे ऐकू आले कि सर्वजण नाचू लागतात. सैराट ने जरी मराठी चित्रपटाचे सर्वे रेकॉर्ड मोडले आले तरी हा सिनेमा लोकांचे प्रबोधन करु शकला नाही, असे मत सिनेमाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने याने व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवडमधील नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या शहीद भगतसिंग व्याख्यानमालेत ‘चित्रपटातून समाजप्रबोधन’ या विषयावरव्याख्यानमालेत नागराज मुंजळे उपस्थित होते . त्यावेळी बोलताना म्हणाले सिनेमाच्या सैराट च्या माध्यमातून जी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला नेमकी ती गोष्ट सोडून लोकांना सगळं काही कळले. लोकांना झिंगाट कळले, सैराट कळले, आर्ची, परशा एवढेच काय तर १०० कोटीही कळले, मात्र प्रबोधन झालेच नाही, अशा खंत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली.

Nagraj manjule Speech 02

चित्रपटातून समाजप्रबोधन चांगले घडू शकते. मात्र, त्याकडे सजगपणे पाहिले पाहिजे. चित्रपटाविषयी बोलले पाहिजे, संवाद झाला पाहिजे तरच प्रबोधन घडू शकते. व्हॉट्स अॅप, फेसबुकमुळे सगळेच पत्रकार झाले आहेत, असे वाटायला लागले आहे, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले. ‘सैराट’ चित्रपटातील दाखवलेला मुख्या मुद्दा हा ‘ऑनर किलिंग’सारखे प्रकार आपल्या आजूबाजूला घडतात त्याबद्दल होता. पण प्रेक्षकांनी हा आशय लक्षात घेतला नाही मग समाजप्रबोधन कसे होणार असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. ‘फॅन्ड्री’ या त्यांच्या या आगोदर प्रसिद्ध झालेल्या चित्रपटातून एका भटक्या जमातीचे दु:ख समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता.हाणामारी आणि गाणी यापलीकडे न गेलेल्या भारतातील करमणूकप्रधान चित्रपटांमधून समाजप्रबोधन कसे घडणार, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
या कार्यक्रमध्ये सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, शैलजा पेरकर, संदीप घाडगे, सुहास घुमरे, राजेंद्र कोकाटे, प्रदीप पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले. आभार प्रदर्शन प्रदीप पवार यांनी केले.
शहीद भगतसिंग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले हे खरे समाजप्रबोधनकार होते. मात्र, आता त्यांच्या सारखी माणसे राहिली नाहीत म्हणून समाज प्रबोधनाची जबाबदारी चित्रपटावर येऊन पडली आहे. भारतात चित्रपटाकडे मनोरंजन म्हणून पाहिले जाते. चित्रपटाच्या आशयाकडे पाहिल्यास चांगले प्रबोधन घडू शकते. कलाकारांच्या कलेच्या पाठीमागे असणारा आशय हा महत्त्वाचा असतो. भारतातील चित्रपट करमणूकप्रधान असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.