Sai and Jitendra team up for upcoming movie

Sai and jitendra new movie 02अभिनेत्री साई ताम्हणकर व जितेंद्र जोशी लवकरच एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. साई ताम्हणकर हीच पहिला चित्रपट चित्रपट होता सनई चौघडे. तिच्या उत्तम अभिनय आणि मनमोहक सुंदरते मुळे तिचे अनेक चाहते निर्माण झाले. या नांतर तिने अनेक चित्रपटातुन तिचे अभिनय कौशल्य दाखवून दिले. तिचे गाजलेले चित्रपट म्हणजे क्लासमेट्स , दुनियादारी , पुणे ५२, नो एन्ट्री पुढे धोका आहे, प्यार वाली लव्ह स्टोरी , जाऊन द्या ना बाळासाहेब. हिंदी चित्रपट सृष्टी मधील हंटर या चित्रपटाने तिला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली.

 

 

साई ताम्हणकर व जितेंद्र जोशी यांच्या या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत निखिल महाजन. निखिल महाजन यांनी या आधी बाजी व पुणे ५२ हे चित्रपट केले होते. यानंतर आता त्यांच्या या आगामी चित्रपटाद्वारे ते एक वेगळे कथानक घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री साई ताम्हणकर व जितेंद्र जोशी हे जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकत्र पाहता येणार आहे. निखिल महाजन हे साई व जोतेंद्र यांचे चांगले मित्र आहेत. पुणे ५२ निखिलच्या पहिल्या चित्रपटात साई ताम्हणकरने काम केले होते तसेच बाजी या चित्रपटामध्ये जितेन्द्रने खलनायकाची भूमिका साकारली होती.

Sai and jitendra new movie 01

निखिल महाजन या आगामी चित्रपटाचे मुख्य कलाकार निश्चित झाले आहेत. साई ताम्हणकर व जितेंद्र जोशी यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे नाव मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. या आधी आपण या जोडीला दुनियादारी चित्रपटात एकत्र पहिला आहे. आता पुन्हा या दोघांना चित्रपटात एकत्र पाहता प्रेक्षकांनचा कसा प्रतिसाद येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
निखिल महाजन साई ताम्हणकर व जितेंद्र जोशी याना त्यांच्या या आगामी प्रोजेक्ट साठी मनःपूर्वक शुभेछा .

Leave a Reply

Your email address will not be published.