‘Saha Gun’ a film based on current education system

आज आपण पाहतो कि शालेय मुलांवरील अभ्यासाचं दडपण वाढले आहे . स्पर्धात्मक युगात ते सतत वेगवेगळ्या दडपणा खाली अडकलेले असतात. या मुळे मुलांना समजून घेणे हे फार गरज आहे. ‘६ गुण’ हा आगामी चित्रपट या वेशीवर आधारित आहे. या चित्रपटाला विविध महोत्सवांमध्ये गौरवण्यात आले आहे.

Saha Gun article 01

या चित्रपटाचा कथानक विद्या सर्वदे या गावातील शाळेत शिकणाऱ्या मुलाच आहे. शाळेत पहिला येणार हा मुलगा आहे. त्याचे वडील परदेशात शास्त्रज्ञ आहेत. आईच्या कडक शिस्तीत त्याचा अभ्यास होतो. तो हुशार आहेच मात्र, जगातील स्पर्धेविषयी अनभिज्ञ आहे.
शाळेत एक नवीन मुलगा येतो. त्याचा नाव राजू , हा हरहुन्नरी मुलगा त्याच्या पेक्षा जास्त गुण मिळवून शाळेत पहिला येतो. विद्या, मागे पडतो , तो राजूची बरोबरी करू शकत नाही.अश्यावेळी अभ्यासातील वाढणारी स्पर्धा त्याच्यावर व त्याच्या पालकांना येणारं दडपण यावर हा चित्रपटात आधारित आहे.
‘६ गुण’ हा चित्रपट किरण गावडे यांचा दिग्दर्श म्हणून पहिला चित्रपट असणार आहे. उज्ज्वला गावडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, अशोक कोटियन आणि शीला राव सहनिर्माते आहेत.शीला राव यांनी “अस्तु” या बहुचर्चित चित्रपटाची निर्मिती केली होती.

Saha gun article 03

‘६ गुण’ या चित्रपटात अभिनेता सुनील बर्वे, अभिनेत्री अमृता सुभाष, आर्चित देवधर, अतुल तोडणकर, आरती सोळंकी, प्रणव रावराणे असे उत्तम कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटत चार गाणी आहेत . सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी ‘या देशाला घडवू या’ हे गाणं गायलं आहे. ‘अभ्यास अभ्यास’ हे गाणे राज पवार यांनी गेले असून संगीत बद्ध केले आहे. तसेच “कबड्डी कबड्डी” हे गाणे राज पवार यांनी संगीतबद्ध केले असून रवींद्र खोमणे यांनी गायलं आहे. कपिल रेडकर यांनी ‘अभ्यास अभ्यास’ या गाण्याचं वेस्टर्न व्हर्जन संगीतबद्ध केले असून गायलं आहे.
शिक्षण व्यवस्थेवर हसतखेळत ६ गुण या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. खेळ, गाणी, नाच अशा प्रकारे मुलांच्या मनोवस्थेचा वेध घेतला आहे. मुलांना आवडतील अश्या प्रकारची गाणी या चित्रपटात आहेत. सर्व पालकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा . हा चित्रपट पाह्यल्यामुळे त्यांना मुलांच्या जाणीवा आणि अभ्यासाचं दडपण या मनोवस्थेची कल्पना येईल.

हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

Saha gun artilce 02

Leave a Reply

Your email address will not be published.