Sachit Patil will be seen in Paresh Rawal’s upcoming Marathi play.

आपल्या उत्तम अभिनयाने बॉलिवूडमधील अनेक चित्रपट गाजवणारे सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल लवकरच मराठी नाटकात निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे नाटक ‘महारथी’ या त्यांच्या मूळ गुजराती नाटकांचं मराठीत रुपांतर असणार आहे. खुद्द परेश रावल या मराठी नाटकात अभिनय करणार नसून ते फक्त या नाटकाची निर्मिती करणार आहेत.

 

Maharathi 02

 

अभिनेता सचित पाटील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतून नुकतंच झळकला होता. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर सचित पाटील कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर सचित पाटीलने नुकतंच स्वतःच्या ट्विटरवरून एक पोस्ट शेयर करून आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली. विशेष म्हणजे मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये सातत्यानं दिसणारा सचित पाटील ‘महारथी’ या नाटकाच्या निमित्ताने एकोणीस वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करत आहे.

 

Maharathi 01

 

‘बदाम राजा प्रॉडक्शन’ निर्मित या नाटकात तो मुख्य भूमिकेत आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेविश्वात काम करणाऱ्या महत्त्वाकांक्षेतून इंदूरहून मुंबईला आलेल्या एका तरुणाची भूमिका सचित या नाटकात साकारत आहे. एका श्रीमंत सिनेनिर्मात्याकडे तो नोकरीला लागतो. त्या तरुणाची महत्त्वाकांक्षा आणि निर्मात्याच्या बंगल्यातलं गूढ उलगडणारं हे नाटक आहे.