Sachin Pilgaonkar announced new movie starring Abhinay Berede

sachin Pilgaonkar Abhinay Berde03

नुकतंच अभिनेता सचिन पिळगांवकर यांचा 61 वाढदिवस साजरा झाला.सचिन यांनी वयाची साठी पूर्ण केल्याच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगांवकर यांनी एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. सचिन याना शुभेच्छा देण्याकरिता या कार्यक्रमात मराठी तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, सचिन तेंडुलकर यांच्यापासून ते जया बच्चन, जॅकी श्रॉफ, जॉनी लिव्हर, बप्पी लहरी, सुरेश वाडकर, वैभव तत्त्ववादी, सुमीत राघवनपर्यंत अनेक सेलिब्रिटी या पार्टीत उपस्थित होते.

 

sachin Pilgaonkar Abhinay Berde01

 

या वेळी सचिन यांनी एक नवा चित्रपट दिग्दर्शित करणार अशी घोषणा केली. तब्बल चार वर्षांच्या गॅपनंतर ते दिग्दर्शनात परतत असून ते एका नवी भूमिका साकारणार आहेत. सचिन पिळगांवकर हे उत्तम अभिनेते ,दिग्दर्शक, निर्माते, गायक आहेत. या आगामी चित्रपटानिमित्त ते संगीतकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत.

 

sachin Pilgaonkar Abhinay Berde04

 

‘अशी ही आशिकी’ असे त्यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव असून लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय बेर्डे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन हे जीवलग मित्र होते. अभिनयने सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केले पण या चित्रपटात तो मेन लीड मात्र नव्हता. आता सचिन यांच्या या आगामी चित्रपटामुळे अभिनय हीरोच्या रुपात आपल्यासमोर येत आहे. अशी ही आशिकी या चित्रपटात अभिनयसोबत सचिन यांचीही एक महत्त्वाची भूमिका असणार आहे. पण अद्याप अभिनेत्रीचा शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन म्हणाले, युथफूल लव्ह स्टोरी असलेल्या या चित्रपटासाठी आम्ही एका नवीन चेह-याच्या शोधात आहोत.