Ritesh Deshmukh making a big Budget film on Shivaji Maharaj

Ritesh Deshmukh as Shivaji 02

अभिनेता रितेश देशमुख हे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार आहे. सकस अभिनय आणि विनोदाचं अचूक टाईमिंग असलेला अभिनेता रितेश देशमुख आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत लवकरच प्रेक्षकांन समोर येणार आहे. सध्या या चित्रपटाविषयी सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच हा मराठी सिनेसृष्टीतील हायबजेट चित्रपट असणार आहे असे हि बोलले जात आहे.

 

रितेशने या विषयी बीबीसी हिंदी या बेबसाइटला मुलाखत दिली. या मुलाखती मध्ये त्याने या आगामी चित्रपटाविषयी माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य दिव्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. महाराजांवर फक्त महाराष्ट्राने नाहीतर अख्या भारताने प्रेम केलं आहे. त्यामुळे हा चित्रपट त्याच्यासाठी फार महत्वाचा आहे असे त्याने सांगतले. त्याने पुढे दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचं बजेट 200 कोटींपेक्षा जास्त असणार आहे. या आधी दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाच्या बजेटबद्दल ट्विटरवरून सांगितलं होतं. चित्रपटाच्या बजेटबद्दल सांगताना रितेशने सांगतले कि ,’सिनेमाचा स्क्रीन प्ले आता तयार झाला आहे. आता प्री प्रॉडक्शनचं काम सुरू होइल आणि त्यानंतर बजेट ठरवलं जाइल. सध्या अभिनेता रितेश देशमुख ‘बँकचोर’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

 

बाहुबली सिनेमाच्या यशा पाहता छत्रपती शिवाजी महाराज हा चित्रपट येत आहे असे बोलले जात होते परिंतु रितेशने या गोष्टीला चक्क नकार दिला व पुढे सारे सांगतले कि,”बाहुबली सिनेमा प्रदर्शित व्हायचा खूप आधी छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवणं निश्चित झालं होतं”. शिवाजी महाराजांनसोबत लोकांच्या सौंवेदनशील भावना जोडल्या आहेत त्यामुळे अतिशय काळजीपुर्वक पाणे हा चित्रपट बनवला जाणार आहे. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खान या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.

Ritesh Deshmukh as Shivaji 01

Leave a Reply

Your email address will not be published.