Riteish Deshmukh celebrated Ganesh Chaturthi in an eco-friendly way

Ritesh Deshmukh ganpati making 01

 

अवघ्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. सध्याही एकिकडे ढोल- ताशांचा गजर, फुलांची आरास आणि प्रचंड उत्साही वातावरण आहे. यातच आपले सिनेकलाकार मोठ्या उत्साहाने बाप्पा च्या आगमनाचा आनंद घेताना दिसत आहेत. यंदाच्या वर्षी अनेक मान्यवरांनी विविध पद्धीतीने गणेशउत्सव साजरा केला आहे. या सर्व उत्साही वातावरणापासून दूर रहात अभिनेता रितेश देशमुख मात्र अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतोय. यंदाच्या वर्षी रितेशने अमेरिकेत गणेशोत्सव साजरा केला असून, त्याने यासंबंधीचा एक व्हिडिओही ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, आसा संदेश सध्या सर्व कलाकार देताना दिसत आहेत. अभिनेता रितेशने नुसता संदेश न देता नोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. रितेशने स्वत: गणपती बाप्पाची मूर्ती बनवली आहे. मोठ्या कलात्मकपणे त्याने हा बाप्पा साकारला असून, त्यामध्ये एक कुंडीही बनवली आहे. ज्यामध्ये त्याने तुळशीचं बीसुद्धा पेरलं आहे. ‘मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, म्हणूनच ही मूर्ती मी सर्व शेतकऱ्यांना समर्पित करतो’, असंही त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.

 

रितेश देशमुख हा हुशार अभिनेता असून त्याला सामाजिक जानवं आहे. आपले पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने त्याने हे विशेष पाऊल उचलून त्याच्या चाहत्यांना एक उत्तम संदेश दिला आहे. त्याने त्याची क्रिएटिव्हीटी या प्रकारे दाखवून दिली. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने रितेश देशमुखने स्वत: गणेशाची इको फ्रेण्डली मूर्ती तयार केली त्याचे शूटिंग करण्याबाबत व अशी अभिनव कल्पना सुचवल्याबद्दल त्याने त्याची पत्नी अर्थात जेनिलिया हिचे विशेष आभार मानले.

 

रितेशने त्याच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवरुन मूर्ती बनवतानाचा व्हिडीयो नक्की पहा :