Renuka Shahane and Sachin Khedekar to work together after 20 years

सचिन खेडेकर आणि रेणुका शहाणे हे मराठी व हिंदी चित्रपटश्रुष्टी मधील नावाजलेले कलाकार आहेत. रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर १९९० च्या दशकात एकत्र काम केले होते. त्या मालिकेचा नाव होतं “सैलाब” . या मालिकेतील त्यांचा अभिनय, त्यांची दोघनमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती . रवी राय यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते.

Renuka and Sachin 01

‘सैलाब’ ही मालिका खूप गाजली होती. रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर यांची या मालिकेत प्रमुख भूमिका होती. या मालिकेमध्ये सचिन खेडेकर यांनी व्यावसायिकदृष्ट्या आयुष्यात स्थिर नसलेली व्यक्तीची भूमिका साकारली होती व रेणुका शहाणे यांनी त्या व्यक्ती ची प्रेमिका असलेल्या व्यक्तीरेखेवर साकारली होती. रेणुका शहाणे यांच्या भावाला ते मान्य नसतं व तोच तो रेणुका यांचं लग्न दुस-या एका व्यक्तीशी लावून देतो. लग्नानंतर ब-याच वर्षानं रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर भेटतात पण त्यावेळी त्या दोघांचंही दुस-या व्यक्तीशी लग्न झालेले असते. अशी परिस्थिती असताना हि त्यांच्या नात्यातील प्रेमसंबंध तितकेच घट्ट असतात. असं सैलाबचं कथानक होतं. जगजीत सिंग यांनी या सैलाब मालिकेतील गाणी गायली होती आणि या मालिकेचे संगीत तलत अझीझ यांनी दिलं होतं.

Renuka and Sachin 03

सैलाब हि ‘मालिका रसिकांच्या मनात घर करून राहिली होती. सचिन आणि रेणुका यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकली. या मालिकेची कथा आणि या या कलारांमधील केमिस्ट्री मुले रसिकांची मने जिंकली होती. हे दोन्ही कलाकार पुन्हा 20 वर्षांनी एकत्र काम करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे .
रेणुका शहाणे यांनी नुकतंच सचिन खेडेकरसोबतचा सेल्फी त्यांनी ट्विटर या सोशल मीडियावर शेअरल केली आहे. त्यांच्या या सेल्फी बरोबर त्यांनी असे लिहिले आहे ,“सचिन खेडेकरसोबत तब्बल 20 वर्षांने शूटिंग करत आहे. हे शूट सैलाब-2 चे आहे का ?, नाही, हे त्याहून काही तरी वेगळे, छोटे आणि तितकंच खास. लवकरच येत आहे”. त्यांच्या या पोस्ट मुळे रसिकांची उत्कंठा वाढली आहे हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published.