Remo D’souza soon to produce a Marathi film

Remo D'souza 01

अलीकडच्या काळात  बॉलीवूड मधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोझा हे उत्तम कोरिआग्राफरच नाही तर उत्तम अभिनेते ,दिग्दर्शक, निर्माता हि आहेत हे त्याने सिद्ध केले आहे. अफलातून या चित्रपटामध्ये त्याने केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांना भरपूर पसंती दिली. तुम बिन, साथियाँ, कांटे या मध्ये त्याने केलेली कोरिओग्राफी सगळ्यांना खूप आवडली. हे सगळं करत असताना त्याने केलेल्या डान्स शो मधून हि त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. डान्स इंडिया डान्स, झलक दिखला जा, डान्स प्लस या त्यांच्या गाजलेल्या डान्स शो मधून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्याच बरोबर त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट फालतू, एबीसीडी, एबीसीडी 2, फ्लाइंग जट, एबीसीडी 3 यांनी त्यांना दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.

 

डेथ ऑफ अमर या छोट्या बजेट असणाऱ्या चित्रपटाचे ते निर्माते होते.. सध्या तो नवाबजीद या राघव जुयाल, धर्मेश येलंडे आणि पुनित पाठक यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची निर्मिती करत आहे तसेच त्याच्या दुसऱ्या चित्रपटात शक्ती मोहन आणि सलमान युसूफ खान हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हिंदी चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर तो मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याच्या विचारात आहे.

 

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे विषय घेऊन चित्रपट निर्मिती सुरु आहे. त्याच्या या आगामी प्रोजेक्ट विषयी बोलताना त्याने सांगतले कि , मराठीत खूपच चांगले चित्रपट बनवले जात आहेत हे चित्रपट इतक्या सुंदर पद्धतीने बनवले जात आहेत कि मराठी नव्हे तर अमराठी लोकांचेदेखील लक्ष वेधून घेत आहेत. आणि या मुळे त्याला हि मराठी चित्रपट निर्मिती करण्याचा मोह झाला आहे. सध्या ते विविध पटकथा वाचत आहे व येणार काही दिवसांमध्ये या चित्रपटावर काम करण्यास सुरवात करणार आहेत. या चित्रपाटाचे दिग्दर्शक व कलाकार यावर आजून विचार सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.