Priya Bapat and Abhay Mahajan’s upcoming movie ‘Gachchi’

Gachchi 02

 

लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स निर्मित ‘गच्ची’ या चित्रपटाचे शूटिंग होत असताना नायकाला झाली ईजा. अभिनेता अभय महाजन चित्रीकरणादरम्यान तो भूमिकेत इतका गुंग झाला कि गच्चीवरील एका कठड्यावर जोरात आदळला.प्रिया बापट हिच्या सोबत एका दृयश्याच्या चित्रीकरणादरम्यान अभयचा बेलेंस बिघडला आणि गच्चीतील एका कठड्यावर त्याचा कपाळमोक्ष झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने स्वतःला अभिनयात पूर्णपणे झोकून दिले आणि एका बेसावध क्षणी त्याचा तोल जाऊन हा अपघात घडला. मात्र यामुळे झालेला परिणामी खूप वाईट होता. अभय ला कठडा जोरात लागून त्याच्या कपाळावर भलीमोठी खोच पडली आणि जखम खोल असल्यामुळे त्यावर टाके मारावे लागले.

 

तो शूटिंग चा फक्त तिसरा दिवस होता आणि पुढे संपूर्ण चित्रपटाचे चित्रिकरण बाकी होता. अभयच्या डोक्यावर पडलेले टाके संपूर्ण चित्रपटात दिसू नये म्हणून त्याची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट क्षणांची साक्षीदार ठरलेली ‘गच्ची’ शहरातील प्रत्येक माणसासाठी खास असते. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. अभय महाजन आणि प्रिया बापट यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.

नचिकेत सामंत दिग्दर्शित ‘गच्ची’ या चित्रपटाचे मुंबईच्या लालबाग येथील ‘विघ्नहर्ता’ या टोलेजंग इमारतीच्या गच्चीवर चित्रीकरण करण्यात येत होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठी प्रेक्षक राहतात या मुळे प्रिया बापट हे नाव या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे. अश्या परिसथितीत २३ मजल्याच्या इमारतीतून गच्ची गाठण्याचे मोठे आव्हान तिच्याकडे व चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडे होते. अनेकवेळा तिने तोंडाला स्कार्फ गुंडाळत तडक लिफ्टच्या दिशेने धावत जात, स्वत:ची ओळख लपवून गच्ची पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तिने केला. पण शेवटच्या दिवशी एक असा प्रसंग घडला ज्यामुळे प्रियाचे गुपित समोर येईल अशी सगळ्यांना धास्ती होती. शेवटच्या सीनचे चित्रीकरण ज्या दिवशी होणार होते आणि लिफ्ट अचानक बंद पडली. गच्चीवर शूट असल्याकारणामुळे अंधार व्हायच्याआधी चित्रीकरण संपवणे खूप महत्वाचे होत. आणि ‘प्रिया’ ला सेटपर्यंत कसे न्यायचे हा प्रश्न टीमला पडला.अभिनेत्री प्रियाने स्वतःचा चेहरा झाकत २३ मजले पायी चढत गच्ची गाठली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आपल्या गच्चीवर प्रिया बापटच्या चित्रपटाचे शुटींग होते, हे बिल्डींगमधील कोणालाच कळले नव्हते. ‘गच्ची’ येत्या २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.