Prasad Oak announces Hirkani on occasion of Women’s Day.

महिला दिनाच्या निमित्त प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकर त्यांचा आगामी चित्रपट घोषित केला . त्या चित्रपटाचे नाव हिरकणी असे आहे. प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकर या जोडीने या आधी कच्चा लिंबू हा चित्रपट केला आहे . कच्चा लिंबू हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. कच्चा लिंबू या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक याने केले असून त्यातील संवाद चिन्मय मांडलेकर याने लिहिले आहेत.
प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकर याना आपण अनेक चित्रपटांमधून पहिले आहे ते दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्या या मैत्रीमुळे चिन्मयच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रसाद असतोच.

Hirkani

प्रसाद ओक यांचा पहिला दिग्दर्शक म्हणून येणार आगामी चित्रपट आहे कच्चा लिंबू . हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. प्रसादची स्वतंत्र दिग्दर्शन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एक सामाजिक विषय मांदणार कच्चा लिंबू हा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी चिन्मय मांडलेकरने संवाद आणि पटकथा लेखन केले आहे.‘कच्चा लिंबू’ या चित्रपटातून अत्यंत महत्वाचा सामाजिक विषय हाताळल्यानंतर, आता हीच जोडी ‘हिरकणी’ हा इतिहासकालीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत असल्यामुळे, रसिकांसाठी हि एक मोठी पर्वणीच ठरणार आहे. हिरकणीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार आहे , हे मात्र अजून गुपित ठेवण्यात आले आहे.

इतिहासातील मातृत्वाच्या महानतेसाठी हिरकणीची गोष्ट नेहमी सांगितली जाते. आई या शब्दांचे सामर्थ्य सांगणारी ही कथा आधुनिक स्त्रीच्या जीवनाशी अगदी मिळती-जुळतीच म्हणावी लागेल. मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरचा एक अवघड बुरुज काळ्याभिन्न अंधारात, आपल्या तान्ह्या बाळासाठी उतरून येणाऱ्या या आईचे साहस इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. किल्ले रायगडाच्या गौरवशाली इतिहासाचाच एक भाग म्हणजे हिरकणी. आपल्या तान्ह्या बाळासाठी अशक्य गोष्टही शक्य करुन दाखवत इतका उंच कडा उतरणाऱ्या हिरकणीला कोणीही विसरले नाही.

प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ या सिनेमाद्वारे आपणास पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. ज्येष्ठ लेखक प्रताप गंगावणे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. चिन्मय मांडलेकरने या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लेखन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.