Prarthana Behere and Sanjay Jadhav to be seen in this upcoming movie
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपली वेगळी ओळख निर्मण केली आहे. आपण त्यांना विविध प्रेमकथा, कौटुंबिक आणि कॉमेडी चित्रपटामध्ये पाहिलं आहे. या वर्षाच्या सुरवातीला आलेला त्यांचा चित्रपट फुगे यामध्ये त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटातून पुन्हा आपल्या समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि केवळ एका महिन्यात या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पूर्ण झाले आहे.
प्रार्थना बेहरे या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिच्यासोबत अभिनेता विद्याधर जोशीदेखील या चित्रपटात आहेत. विद्याधर जोशी यांनी याआधी सतरंगी रे आणि बावरे प्रेम हे या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटाबाबत अजून एक विशेष गोष्ट म्हणजे दिग्दर्शक संजय जाधव या चित्रपटात अभिनेता म्हणून झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हॉस्टेल डेज या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय नाईक यांनी केले आहे. या आधी त्यांनी बावरे प्रेम हे, लग्न पहावे करून, सतरंगी रे या चित्रपटाचे लेखन केले आहे. हॉस्टेल डेज या चित्रपटाची कथा हि त्यांनी लिहिलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर जेव्हा लाँच करण्यात आले तेव्हा आयुष्यातले सगळ्यात मस्त क्षण अशी टॅगलाइन त्यासोबत लिहिली गेली होती. यावरून या चित्रपटामध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला काळ पुन्हा एकदा जगता येईल आसा हा चित्रपट आहे हे समजते. नव्वदच्या दशकातील काही जुन्या आठवणींना या चित्रपटामध्ये दाखवल्या जाणार आहेत.
दिग्दर्शक अजय नाईक यांनी या चित्रपटाविषयी बोलताना सांगतले कि ,प्रार्थना एक खूप चांगली आणि प्रोफेशनल अभिनेत्री आहे व त्यांच्या सोबत काम करताना मजा आली. तसेच विद्याधर जोशी यांच्यासोबत हा अजय यांचा तिसरा चित्रपट आहे. त्यामुळे त्यांचे ट्युनिंग खूप चांगले जमले आहे. या चित्रपटाचे काही प्रमाणात चित्रीकरण अलिबाग येथे केले गेले आहे तसेच एका गाण्याचे चित्रीकरण रेवदंडा येथे करण्यात आले आहे. हॉस्टेल डेज या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते, गुरू ठाकूर या टीम ने बनवली असल्यामुळे अतिशय सुंदर गाणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.