Oscar nominee :Sunny Pawar

मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे . याच मुंबई मधील कालीना झोपडपट्टीतून थेट ऑस्कर सोहळ्यात जाणारा मुंबईकर बालकलाकार सनी पवारवर जगभरातूनकौतुकाचा वर्षाव झाला. सनी पवार या आठ वर्षाच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने संपूर्ण जगाला भारावून सोडले आहे.

Sunny Pawar 01
Lion या Hollywood सिनेमातून पहिल्यांंदाच चित्रपटात काम केले आहे .सनीने सर्व दुनियेसमोर एक International Child Actor म्हणून ओळख निर्माणकेली आहे.लायन या सिनेमात सनीने अभिनेता देव पटेलची बालपणीची भूमिका केली होती व त्यावेळी तो फक्त सहा वर्षाचा होता.या सिनेमाची कथाभितीदायक असतानाही त्याने त्याची भूमिका मोठ्या खुबीने साकारली. त्यांच्या या अभिनयामुळे Oscar च्या दिमाखदार सोहळ्यात देखील तो सर्वांच्यालक्षात राहिला.लायन’ चे दिग्दर्शन गार्थ डेव्हीस यांनी केले आहे . त्यांना या चित्रपटातील सुरु नामक पात्रासाठी एका वेगळ्याच चेहेरा हवा होता. यासाठी त्यांनीसंपूर्ण भारतभर अनेक शाळांमधून  दोन हजारांवर मुलांच्या ऑडिशन व्हिडिओ टेप पाहिले. असंख्य बालकलाकारांच्या आॅडिशन्स मधून जेव्हा सनी पवारगार्थसमोर आला तेव्हा त्यांचा शोध संपला. सनीचे सुंदर डोळे आणि त्यातील चमक पाहून त्यांनी सनीची निवड केली.

Sunny Pawar 02
सनी कलिना येथील एअर इंडिया मॉडर्न नावाच्या शाळेत शिकत आहे. सनी ने काम केलेल्या लायन चित्रपटाला ऑस्करमध्ये अनेक नॉमिनेशन मिळालंहोतं.या चित्रपटात त्याने सरू ब्रायरर्ली या मूळ भारतीय असलेल्या पण ऑस्ट्रेलियन दाम्पत्याने दत्तक घेतलेल्या लहानग्या मुलाची भूमिका साकारली आहे.अनेक वर्षानंतर हरवलेल्या आपल्या पालकांचा शोध घेण्याचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे.

विशेष मन्हजे सनीच्या अदाकारीचा जलवा त्याचे कुटुंबीय तसंच मुंबईच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचा-यांना अनुभवता येणार आहे. लायनसिनेमाचा विशेष प्रिमीयर सोहळा त्यांच्या  साठी आयोजित करण्यात आला आहे. सनी हा या शाळेचा पहिला विद्यार्थी आहे ज्याने शाळेचे नाव देशातच नाहीतर जगभरात उंचावलं आहे त्यामुळे त्याच्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासाठी हा क्षण खूपच खास असणार आहे. या प्रिमीयरच्या माध्यमातून आपल्या लाडक्या सनीच्या अभिनयाची जादू या सा-यांना अनुभवता येणार आहे. 
जरी सनी च नाव या सर्व मोठ्या पुरस्कारात नसेल परंतु एका मराठी मुलाची हि गरुड झेप कौतुकास्पद आहे. सनी ला WWE मधील खेळाडूंना भेटण्याचीइच्छा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.