Nashik girl Anjali Patil to work with superstar Rajinikanth

Anjali Patil 01
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अंजली पाटील लवकरच सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर झळकणार आहे. मूळची नाशिकची असलेली अन् मराठीबरोबर अनेक भाषांचे ज्ञान असलेली अभिनेत्री अंजली पाटील हिने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे. नुकताच अंजलीच्या या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. अंजलीबरोबरच या चित्रपटात अभिनेत्री हुमा कुरेशी हिचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Anjali Patil 03
अभिनेत्री अंजली पाटील हिने या आधीही अनेक दाक्षिणात्य चित्रपटामधने काम केले आहे. याआधीही तिने दाक्षिणात्य सिनेमात काम केलं आहे. दिल्ली इन ए डे, चक्रव्यूह या सिनेमातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विथ यू विदाऊट यू या श्रीलंकन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सिल्वहर पीकॉक हा पुरस्कार गोव्यातील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिला मिळाला. तसेच तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व स्पेशल मेन्शन पुरस्काराने तिला गौरवण्यात आले आहे. फाईंडिंग फॅनी या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाच विशेष कौतुक करण्यात आले. या शिवाय मराठी सिनेमातही अंजलीने काम केले आहे. सायलेन्स या चित्रपटाचे विशेष कौतुक करण्यात आले होते. लवकरच बर्दो या सिनेमातून ती मराठी रसिकांच्या भेटीला येणार आहे. हा मराठी सिनेमा लवकरच रिलीज होणार असून यांत अंजलीसह मकरंद देशपांडे, अशोक समर्थ यांच्या भूमिका आहेत.

Anjali Patil 04
‘थलायवा’ अर्थात सुपरस्टार रजनीकांत यांच्या सिनेमात एकदा तरी काम मिळाव अशी प्रत्येक अभेनेत्री ची इच्छा असते. पण हि संधी काही नशीबवान लोकांनाच मिळते. ‘काला कारिकालन’ या रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटात अंजली पाटील झळकणार आहे. ट्विटर या सोशल साईट मधून अंजली ने हि बातमी तिच्या चाहत्यांना दिली . ‘काला कारिकालन’ हा तमिळ सिनेमा असून त्यांचा जावई धनुष या सिनेमाची निर्मिती करणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुरार या चित्रपटाची शूटिंग जूनमध्ये सुरु होणार आहे. रजनीकांत यांच्यासह काम कार्याला मिळणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे असे अंजली ला वाटते तसेच या सिनेमातील भूमिकाही विशेष लक्षवेधी असल्याने सिनेमाबाबत बरीच उत्सुकता असल्याचे तिने सांगतले.

Anjali Patil 02

Leave a Reply

Your email address will not be published.