Mrinmayee Godbole learnt Kung Fu for this movie

Mrinmayee learns Kung fu 02

आजपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्स ने चित्रपटासाठी मार्शल आर्ट्सचं ट्रैनिंग घेतली आहे हे तर आपण सर्व जण जाणतो. आता मराठी कलाकार हि या क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘चि. व चि.सौ.कां.’ चित्रपटातील मुख्य अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेने या चित्रपटासाठी ‘कुंग फू’चं प्रशिक्षण घेतलं आहे.

 
‘चि. व चि.सौ.कां.’ या आगामी चित्रपट आपण अभिनेत्री मृण्मयीला मुख्य भूमकी साकारताना पाहणार आहोत. तिच्या या भूमिकेसाठी तिने ‘कुंग फू’चं प्रशिक्षण घेतले व आपण तिला पडद्यावर ‘कुंग फू’ करताना पाहणार आहोत. मृण्मयीला खेळाची विशेष आवड असून ती (राष्ट्रीय पातळीवर) १० वर्ष बास्केटबॉलसुद्धा खेळली आहे. असे असले तरी कुंग फू’ तिच्यासाठी फारच नवीन प्रकार होता जो तिने आधी कधीही शिकण्याचा प्रयत्न केले न्हवता. या चित्रपटाच्या निमित्ताने ती व ललित प्रभाकर दोघांनीही ‘कुंग फू’चं प्रशिक्षण घेतले.

Mrinmayee learns Kung fu 01
या चित्रपटात मृण्मयी ने साकारलेले पात्र ‘कुंग फू- ब्लू बेल्ट’ आहे त्यामुळे तिला हे ट्रेनिंग करणे अतिशय महत्त्वाचं होते. पुढे ती आसा हि सांगते कि त्यांचे ट्रेनर श्रीकांत सर यांनी अगदी सक्तची ट्रेनिंग करून घेतली व त्यांच्याकडून कठीण व्यायाम व स्ट्रेचिंग करून घेतलं. तीला असे वाटले कि तिने एका महिन्यात वर्षभराचं ‘कुंग फू’ शिकले आहे . ‘कुंग फू’चं प्रशिक्षण खूपच थकवणारं होतं, पण त्याची चित्रपटामध्ये त्यांना खूप मदत झाली. त्यांच्या या ट्रैनिंग दरम्यान त्यांना दुखापतही झाली पण, चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दृष्टीने हे सर्व महत्त्वाचं होतं.’

Mrinmayee learns Kung fu 03

‘जुळून येती रेशीमगाठी’ या गाजलेल्या मालिकेतील अभिनेता ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले पहिल्यांदा स्क्रिन शेअर करत आहेत.‘चि. व चि.सौ.कां.’ ही झी स्टुडिओची निर्मिती असून परेश मोकाशी या चित्रपटाचं दिग्दर्शक आहेत.

 

 

१९ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.