Milind Shinde’s next directorial movie based on sports.

Milind Shinde 02

अभिनेता मिलिंद शिंदे यांनी त्यांच्या सकस अभिनयानं चित्रपट सृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केले. त्यांना आपण अनेक चित्रपट, टीव्ही मालिका आणि रंगभूमीवर अभिनय करताना पहिले आहे. आता मिलिंद शिंदे हे दिग्दर्शकच्या भूमिकेत प्रेक्षकांन समोरे येणार आहे असे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मिलिंद शिंदे लवकरच ते स्पोर्ट्स वर आधारित एक चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटाचे नाव सध्या गुप्ता ठेवण्यात आले असून राधे मोशन पिक्चर्सनं या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तसेच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद किरण बेरड यांनी लिहिले आहेत.

 
या चित्रपटाचे शूटिंग शिर्डी येथे सुरु झालेली आहे.विशेष म्हणजे या मराठी चित्रपटात बॉलिवूडमधील स्पोर्ट्सवर आधारित चित्रपटांसारखीच भव्य दिव्यता प्रेक्षकांना पाह्यला मिळणार आहे. असून कॅमेरामन म्हणून प्रताप नायर तर मंगेश धाकडे हे संगीतकार म्हणून काम पाहणार आहेत.

 

 

या आधी ‘नाच तुझंच लगीन हाय’ आणि ‘भिडू’ या दोन चित्रपटाचं दिग्दर्शन मिलिंद शिंदे यांनी केले होते. ‘नाच तुझंच लगीन हाय’ या चित्रपटाला सेन्सॉर ची परवानगी न मिल्याने हा चित्रपट प्रेक्षकांपुढे अद्याप आलेला नाही. ‘भिडू’ हा चित्रपट मात्र लवकरच प्रदर्शित होणार असे समजते आहे.

 

 

खेळावर आधारित या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, अभिजित चव्हाण, नयन जाधव, प्रकाश धोत्रे हे कलाकार झळकणार आहेत. मिलिंद यांच्या या चित्रपटामुळे मराठी प्रेक्षकांना वेगळा विषय अनुभवता येणार आहे. शिवछत्रपती पुरस्कारात न स्वीकारता एक खेळाडू काही कारणानं आपल्या गावी परत जातो व गावात चोरी करणाऱ्या तीन मुलांना खेळाकडे आकर्षित करून त्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत कसं नेतो, अशी अनोखी गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

 

दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांच्या मते, ‘खेळावर आधारित एक कथानक हाताळताना वेगळा आनंद आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच वेगळा अनुभव देईल,’. मिलिंद शिंदे यांच्या या चित्रपटाच्या निमित्तानं मराठीत बऱ्याच काळानं स्पोर्ट्स फिल्मची निर्मिती होत आहे.

Milind Shinde 01

Leave a Reply

Your email address will not be published.