Milind Shinde shoots at Balewadi stadium Pune

Milind Shinde new movie 02

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन विषयांवर चित्रपट बनवले जात आहेत. नवीन विषय चित्रपटाचा माध्यमाने मांडून समाज प्रभोधन करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करत आहेत. आशय प्रकारच्या आशय प्रधान चित्रपटांना प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळताना दिसत आहे. विनोदी, कौटुंबिक सिनेमांपेक्षा असे चित्रपट पाहणारं नवीन प्रेक्षकांवर तयार होताना दिसतोय. असाच एक वेगळा प्रयोग दिग्दर्शक मिलिंद शिंदे करणार आहेत. खेळावर आधारित चित्रपट मिलिंद शिंदे मराठी प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट अॅथलेटिक्सवर आधारित असणार आहे.

 

या चित्रपटाची कथा एका शिवछत्रपती पुरस्कार डावलून आपल्या गावी परत गेलेल्या खेळाडू ची आहे. गावातल्या चोरी करणा-या तीन मुलांना खेळाकडे आकर्षित करुन तो त्यांना राष्ट्रीय पातळीवर कसं नेतो हा प्रवास चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाचा विषय खेळावर आधारित असल्यामुळे पुण्यातील बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियममध्ये शूटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेचं चित्रीकरण बालेवाडी स्टेडियममध्ये झाले आहे.

Milind Shinde new movie 01

विविध स्पर्धांसाठी लोकप्रिय असलेलं बालेवाडीचं हे स्टेडियम आता सिनेमांसाठीही वापरलं जाऊ लागलं. याआधी हिंदीत सुपरहिट ठरलेल्या दंगल सिनेमाचं शुटिंगही बालेवाडीतल्या स्टेडियममध्ये झालं होतं. दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी सांगितलं, “नाशिक, रत्नागिरी इथं जाऊन शुटिंग करणं शक्य नव्हतं. त्याशिवाय बालेवाडी स्टेडियममध्ये असलेली भव्यता शुटिंगसाठी महत्त्वाची असल्याने हाच पर्याय निवडला”. या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदाच बालेवाडीत शूटिंग पार पडलं आहे. या चित्रपटाचे निर्मिती मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. तसेच या चित्रपटाचे लेखन किरण बेरड यांनी केलं आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलं नसलं तरी मिलिंद शिंदे यांचा हा वेगळा प्रयोग रसिकांना नक्कीच भावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.