Marathi Entertainment Industry extends helping hand to flood affected people.

Subodh bhave 01

 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिशय वाईट पूर परिथिती निर्माण होऊन अनेक लोकांवर संकट आले आहे. पूरग्रस्त असलेल्या सांगली, कोल्हापूर आणि कोकण पट्ट्यातील भागाला आज सकाळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद आणि मराठी मनोरंजन सृष्टीकडून मदत रवाना झाली. मदतीचे साहित्य घेऊन जाणारे ट्रक मुंबई तसेच पुण्याहूनही रवाना होणार असून यासंदर्भातील एक व्हिडिओ अभिनेता सुबोध भावेने ट्विट केला. मराठी सिने आणि नाटक सृष्टीच्या माध्यमातून आणखीन मदतही केली जाणार आहे.

 

 

महारातष्ट्रातील अनेक ठिकाणी जसे कि कोल्हापूर ,सांगली तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पुराने थैमान घातल्यामुळे मराठी कलाकारांनी स्वत: पुढाकार घेत या भागांमधील लोकांना मदत पाठवण्याचा निर्धार केला. कलाकारांनी स्वखर्च ने तसेच प्रेक्षकांच्या माध्यमातून गोळा केलेलं साहित्य पूरग्रस्तांना पाठवण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, पिंपरी-चिंचवड या वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेलं १२ ट्रक भरुन सामान पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून पाठवले आहे. मुंबई येथून निघणाऱ्या ट्रक ची तयारी स्वतः कलाकारांनी मध्यरात्री साडे बारापर्यंत केली.

 

वेगवेगळ्या ठिकाणावरून लोकांकडून येणारी मदत कलाकारांनी नियोजनबद्ध पद्धतीने एकत्र केली. इतकंच नाही तर मुंबईमधील मदत केंद्रांवर अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, संदीप पाठक हे कलाकार स्वत: उपस्थित राहून सामानाचे पॅकिंग करत होते. कलाकारांनी तांदूळ, डाळींची पाकिटं तयार करणे, वस्तूंचे वर्गीकरण करणे या सर्व कामामध्ये स्वतःला झोकून काम केले. नाटकांमध्ये बॅकस्टेजवर काम करणाऱ्या अनेकांनी या कामामध्ये मदत केली. प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला लागणाऱ्या सामानाचे वर्गिकरण करुन ते सामान ट्रकमधून पाठवण्यात आले आहे. तांदूळ, गव्हाचं पीठ, डाळी, झाडू, तेल, मीठ, साखर, साडी, चादरी, अंगाचे साबण, कपड्याचे साबण, ब्रश, टूथपेस्ट, दुधाची पावडर, मुलांसाठी वह्या, पेन, पेन्सिल अशा बऱ्याच गोष्टी एका पॅकमध्ये प्रत्येक कुटुंबासाठी कलाकारांनी पाठवले आहेत. किमान काही दिवस तरी हे सामान पूरग्रस्त लोकांना आधार देईल अशी अशा बाळगून पाठवणयत येत आहे. पूरग्रस्त भागात पोहोचल्या नंतर चित्रपट महामंडळ आणि नाट्य परिषदेच्या सदस्यांकडून आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात येणार आहे.