Mangesh Desai will play a negative role in this upcoming movie.

अभिनेता मंगेश देसाई हे मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते. सकस अभिनय , वैविध्यपूर्ण भूमिका करत त्यांनी अवघ्या महाराष्ट्रावर आपल्या अभिनयाची छाप पडली आहे. असे हे चतुरस्त्र अभिनेते मंगेश देसाई लवकरच एक वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत.अनेक प्रेमकथा, विनोदी, कौटुंबिक, रहस्यमय, चरित्रपट अशा वैविध्यपूर्ण चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. परंतु आता या सगळ्यापेक्षा वेगळी भूमिका ते ‘जजमेंट’ या आगामी चित्रपटात साकारत आहेत. ‘जजमेंट’ या चित्रपटात ते प्रथमच खलनायकाची भूमिका साकारत आहेत. एका आयएएस ऑफिसरची भूमिका ते पडद्यावर साकारणार असून अंगावर शहारे आणणारी ही व्यक्तिरेखा आहे.

 

MAngesh desai 02

 

या आधी केलेल्या चित्रपटात त्यांनी आजवर त्यांनी अनेक चांगली – वाईट व्यक्तिमत्वे साकारत समाजातील वास्तविक परीस्तीत आपल्या समोर आणली. पण या वेळी जे भूमिका ते साकारत आहेत अशा प्रकारची नकारात्मक भूमिका ते प्रथमच करणार आहेत. त्यांच्या या भूमिकेच्या निमित्ताने समाजातील काही नकारात्मक बाबीही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. माणूस किती विकृत असू शकतो आसा विचार कार्याला लावणारी हे व्यक्ती रेखा आहे. या भूमिकेविषयी सांगताना मंगेश देसाई म्हणतात, कलाकारांना विविध भूमिकेप्रमाणे स्विच ऑन, आणि स्विच ऑफ असे करावे लागते परंतु या चित्रपटातील भूमिका या गोष्टीस अपवाद आहे. ही व्यक्तिरेखा त्यांना शुटिंगनंतरही विचार करण्यास प्रवृत्त करीत होती.परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते अजिबात तसे नाहीत. आणि असे असले तरीही त्यांनी त्यांच्या परीने या भूमिकेस पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शूटिंग चे पॅकअप झाल्यावर त्यांना या भूमिकेने भावनिकदृष्ट्या निराश केले आहे. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे हि भूमिका खूप क्रूर आणि भयंकर आहे ज्यामुळे त्यांना अनेकदा खूप वाईट वाटले आहे.

 

MAngesh desai 03

 

हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा प्रेक्षकांनमध्ये वाढलेली दिसत आहे. विशेष म्हणजे मंगेश देसाई यांच्यासोबत तेजश्री प्रधान यांचीही या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. ‘जजमेंट’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. प्रल्हाद खंदारे व हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी केली असून समीर रमेश सुर्वे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘जजमेंट’ हा चित्रपट येत्या २४ मे रोजी प्रदर्शित होत आहे.