‘Mala Kahich Problem Nahi’ official poster launched

Mala Kahich Problem nahi Poster 02
बऱ्याच दिवसं पासून स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी यांच्या आगामी चित्रपटाची चर्चा रंगली होती. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे ऑफिशिअल पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाल्या नंतर प्रेक्षकांनी बारभारून दाद दिली आहे. या पोस्टर मध्ये गश्मीर-स्पृहासह त्यांच्या फॅमिली मेंबर्सची पण ओळख करुन दिली गेली.

 
आजच्या धावपळीच्या युगात सर्वजण कुठल्या न कुठल्या स्पर्धेत बीझी आहेत त्यामुळे ‘फॅमिली टाईम’ हा कुठेतरी हरवून गेला आहे. सध्या कामातून वेळ मिळाला तर लोक स्वतःच्या प्रॉब्लेम्सचे गुणगान करताना दिसतात. अश्या वेळी जेव्हा प्रत्येकाला आपले प्रॉब्लेम्स किती मोठे वाटतात त्यावेळी “मला काहीच प्रॉब्लेम नाही” असं कोणी म्हटलं तर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. यामुळे “मला काही प्रॉब्लेम नाही” म्हणणारे गश्मीर महाजनी आणि स्पृहा जोशी यांच्याविषयी सगळीकडे चर्चा सुरु आहे.

 

 

“मला काही प्रॉब्लेम नाही” या आगामी चित्रपटामध्ये गश्मीर महाजनी आणि स्पृहा जोशी प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार निर्मिती सावंत, कमलेश सावंत, विजय निकम, मंगल केंकरे, साहील कोपर्डे, सीमा देशमुख, आरश गोडबोले, स्नेहलता वसईक व सतीश आळेकर या चित्रपटात झळकणार आहेत.

 
या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले असून पी.एस छतवाल, रिचा सिन्हा आणि रवी सिंह यांनी या चित्रपटाची ची निर्मिती केली आहे.
“मला काही प्रॉब्लेम नाही” २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Mala Kahich Problem nahi Poster 01

Leave a Reply

Your email address will not be published.