‘Mala Kahich Problem Nahi’ Music launch event held at Hotel Orchid Mumbai. ..

MKPN music launch 01

 

‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या समीर विद्वांस दिग्दर्शित चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. चित्रपटाचा फ्रेश लूक, दमदार स्टारकास्ट आणि वेगळ्या धाटणीचं कथासूत्र या मुले या चित्रपटाची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. या म्युझिक लाँच साठी निर्मात्या रिचा सिन्हा, रवी सिंघ त्याचबरोबर स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, विजय निकम, कमलेश सावंत, मंगल केंकरे, सतीश आळेकर, सीमा देशमुख आणि इतर कलाकार उपस्थित होते . तसेच या चित्रपटाचे लेखक कौस्तुभ सावरकर व दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

 

 

MKPN music launch 04

 

 

मराठी छोत्रपटसृष्टीतील इतर मान्यवर या दिमाखदार सोहळ्यात आवर्जून सहभागी झाले होते. चित्रपटातील ‘तुझ्यासाठी आता असणेही, नसणेही’ या गाण्यावर अभिनेता गश्मीर महाजनी व अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी रोमँटिक डान्स सादर केला. हे गाणे जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे. जसराज आणि आनंदी यांचा सुमधुर आवाज आणि गश्मीर-स्पृहा यांचा उत्तम सादरीकरणाने यामुळे वातावरण गुलाबी झाले होते. त्यानंतर अभय जोधपूरकर आणि प्रियांका बर्वे यांचे विरल्या केव्हा हळुवार ह्या भावना हे गाणे सादर केले. तसेच बेला शेंडे यांनी तुका साद तुझ्या माहेरची वाट देता गो हे चित्रपटातील गाणे त्यांच्या सुंदर आवाजात सादर केले. बेला शेंडे यांच्या या कोकणी गाण्याच्या सादरीकरणाबरोबरच विडिओ ही लाँच करण्यात आला.

 

MKPN music launch 03

 

 

‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक हृषीकेश-सौरभ आणि जसराज असून ही गाणी गीतकार गुरु ठाकूर व वैभव जोशी यांनी लिहली आहेत. या चित्रपटात एकूण ४ गाणी आहेत .

 

 

MKPN music launch 02

 

 

 

‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा चित्रपट 28 जुलै ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा आहे तोपर्यंत एन्जॉय करा या चित्रपटाचा फर्स्ट लुक !!

 

Leave a Reply

Your email address will not be published.