‘Mala Kahich Probem Nahi’ team plays cricket match

MKPN Cricket Match 01

 

‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण फक्त पैसा, यश, सुखी संसार यासर्वांच्या मागे पळतो. या सगळ्या धावपळीमध्ये आपण आपली माणुसकी आणि आपल्या ,माणसांपासून दूर होत चालो आहोत. एखाद्या दिवशी सर्वानी एकत्र येऊन एकमेकांसोबत वेळ घालवून आनंद अनुभवणे फार महत्वाचे वाटते. रील लाईफ जगत असाच अनुभव स्पृहा – गश्मीरला आला आहे. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने त्यांच्या छोट्या तनय म्हणजेच आरश गोडबोले याच्या इच्छेखातर नागपूर पँथर्स विरुद्ध कोकण वॉरिअर्स अशी जोमदार क्रिकेटची मॅच खेळवली.

 

MKPN Cricket Match 02

 

‘नागपूर पँथर्स’ विरुद्ध ‘कोकण वॉरिअर्स’ नावातूनच नागपूर विरुद्ध कोकण असा सामना रंगलेला होता हे कळतं. त्याच कारण म्हणजे, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ म्हणतं असलेला अजय म्हणजेच गश्मीर नागपूर चा तर केतकी म्हणजेच स्पृहा कोकणची असल्यामुळे ते आपापल्या परिवारासह आपल्या गावांना प्रतिनिधित्व करत होते. एका टीम मध्ये विजय निकम, स्नेहलता वसईकर, साहील कोपर्डे, करण भोसले यांची गश्मीरला तगडी साथ होती तर दुसरीकडे सीमा देशमुख, सुरभी हेमंत, आरश गोडबोलेच नव्हे तर चित्रपटाचे निर्माते रवि सिंग आणि रिचा सिन्हा यांचा स्पृहावर गाढ विश्वास. स्पृहाच्या कोकण वॉरिअर्सला सपोर्ट करत मास्टर आरशने टॉस केला. गश्मीर ने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेऊन ६ ओव्हर्स मध्ये ८६ धावा काढल्या. तर पूर्णपणे आत्मविश्वासाच्या बळावर खेळत असलेल्या स्पृहाने ३ वेळा आऊट होऊन, गश्मीरच्या बॉलिंगने जखमी होऊन देखील ६ ओव्हर्स मध्ये तब्बल ३८ धावा घेत आपल्या टीमला पुढच्या मॅच मध्ये आपणच जिंकणार असल्याचं आश्वासन दिलं. हे सगळं सुरु असताना छोटा तनय म्हणजेच आरश गोडबोले जो सुरवातीला आईच्या टीममध्ये होता तो शेवटी त्याच्या बाबांच्या टीम मधे गेला.

 

आपल्याला एकत्र घट्ट बांधून ठेवणारी ही नाती अनुभवायची असतील तर पी.एस. छतवाल, रवि सिंग आणि रिचा सिन्हा यांच्या फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित चित्रपट ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ येत्या ११ ऑगस्टला पाहायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published.