Makarand Anaspure to play this role in upcoming movie ‘Thank U Vitthala’

Makarand in Thank U Vitthala 03

 

मुंबईतील डबेवाल्याना ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखल जातं. या सदैव कार्यरत लोकांनी फक्त भारतात नव्हे तर जागतिक पातळीवरही आपल्या कार्याचा ठसा उमटवत जगासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. मुंबईतील डबेवाल्याची खुद्द लंडनच्या प्रिन्सने देखील दाखल घेतली. भुकेल्या मुंबईकरांना वेळेवर जेवणाचा डबा पोहचवणारे मुंबईतील डबेवाले हे त्यांच्या अचूक ‘कामासाठी सगळीकडेच प्रसिद्ध आहेत. अश्याच एका डबेवाल्याची भूमिका प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरें त्यांच्या आगामी चित्रपटात साकारणार आहेत. मकरंद विनोदी अभिनयासोबतच आपल्या धीरगंभीर भूमिकांनसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या उत्तम अभिनयाने ते अतिशय गंबीर विषय हि खूप सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात.अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत.’Thank U विठ्ठला’ या आगामी मराठी चित्रपटात मकरंद मुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

 

Makarand in Thank U Vitthala 02

 

मकरंद या भूमिकेच्या माध्यमातून डबेवाल्यांच्या अनोख्या विश्वाचा वेध घेतला जाणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना ते म्हणतात .”सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्येही हिरीरीने सहभागी होणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांचं प्रतिनिधीत्व करणारी भूमिका साकारताना आजवर केलेल्या कामापेक्षा काहीतरी खूप वेगळं केल्याचं समाधान लाभले आहे”. ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटात कंटाळवाणं दैनंदिन जीवन जगणाऱ्या मकरंदने साकारलेल्या डबेवाल्याला भगवान विठ्ठलाची साथ लाभल्यानंतर त्याच्यात आयुष्यात काय बदल होतात आणि त्यानंतर त्याचा जीवनप्रवास कसा सुखकर होतो हे दाखवण्यात आले आहे.

 

एम.जी.के. प्रोडक्शनची प्रस्तुती तसेच गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांनी केलं असून, या चित्रपटाची कथादेखील त्यांचीच आहे. चित्रपटाचे सहनिर्माते एम.सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. ३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला’ प्रदर्शित होणार आहे.