‘Lapachhapi’ horror story based on true events

lapachhapi 01

सध्या मराठी चित्रपट सृष्टीत अनेक विषय हाताळे जात आहेत. त्याच प्रमाणे अॅक्शनपट, सस्पेन्स, थ्रीलर सिनेमांची संख्या वाढत आहे. अजून एका विषयावर आपण नवीन प्रयोग होताना पाहत आहोत आणि तोच म्हणजे हॉररपट. लवकरच तुमच्या भेटीसाठी येत आहे हॉरर चित्रपट ‘लपाछपी’.

 

व्हाईल्ड एलिफंट्स मोशन पिक्चर्स, अमिडास टच मुव्हिज प्रॉडक्शन प्रस्तुत आणि विशाल फुरिया दिग्दर्शित ‘लपाछपी’ची निर्मिती जितेंद्र पाटील आणि अरुणा भट यांनी केली आहे. या चित्रपटात पूजा सावंत, विक्रम गायकवाड, उषा नाईक आणि अनिल गवस यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

या आधी पूजा सावंतने क्षणभर विश्रांती, सतरंगी रे, दगडी चाळ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या सगळ्याच चित्रपटातील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. आज एक अभिनेत्री म्हणून तिने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. पोस्टर बॉइज या चित्रपटात अनिकेत विश्वासरावसोबत तिची केमिस्ट्री खूपच चांगली जुळून आली होती. तिच्या या चित्रपटाची चांगली चर्चा देखील झाली होती. पूजा ही एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारी अभिनेत्री आहे.

 

‘लपाछपी’ हा चित्रपट सत्य घटनेंपासून प्रेरित आहे. तसेच या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे टीझर सोशल साईट वर लोकांची उत्सुकता वाढवताना दिसत आहेत. आतापर्यंत च्या टिझरमध्ये कशेडी घाट, शनिवारवाडा, डिसुझा चाळ या ठिकाणी घडणाऱ्या विलक्षण घटनांची चाहूल दाखवण्यात आली आहे.या सिनेमाच्या माध्यमातून माहित नसलेल्या गोष्टींचा खुलासा करण्यात येईल.
‘लपाछपी’ हा चित्रपट १४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तोपर्यंत नाकी पहा ‘लपाछपी’ टीझर मधील हा खेळ-

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.