Kushal Badrike soon to be seen on big screen

Kushal in movie 01

‘चला हवा येऊ द्या’ या सुपरहिट शोमधून वेगवेगळ्या अदाकारीतून कायम प्रेक्षकांना हसत ठेवणारा अभिनेता कुशल बद्रिके. विविध भूमिका कॉमेडीचं अचूक टायमिंग यामुळे कुशल बद्रिकेने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच चला हवा येऊ या शोसोबतच छोट्या पडद्यावरील विविध कॉमेडी शो, मालिका आणि सिनेमातही काम केलं आहे. बायस्कोप’ या सिनेमातील ‘एक होता काऊ’ या कथेत कुशलने साकारलेली काऊ म्हणजे स्वप्नीलची भूमिका पेरक्षकांना खूप आवडली. फक्त प्रेक्षकच नाही तर सेलिब्रिटीही त्याच्यावर फिदा झालेत.

Kushal in movie 02

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुशलचा आता आगामी ‘स्लॅमबुक’ हा सिनेमाल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्लॅमबुक’मधून देखील एक नवा कुशल आपल्याला पाहायला मिळेल हे नक्कीच. सध्या तो या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाबद्दल माहिती त्याने फोटोसहा सोशल मीडियावर शेअर केला आहे.या फोटोमध्ये कुशलचा काही वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या सिनेमातही कुशलचा गावरान अंदाज रसिकांना पाहायला मिळणार आहे. या आधी त्याने स्कीटमध्ये गावरान भूमिका प्रभिवीपणे साकारल्या आहेत.

 

गावरान लूकमधला फोटो जेव्हा त्यानं आपल्या फॅन्ससोबत शेअर केला, त्यावेळी त्याच्या या पोस्ट ला भरभरून पसंती मिळाली. तसेच त्याने तुमच्या शुभेच्छा सदैव सोबत असू द्या अशी कॅप्शनही या फोटो सोबत केले आहे. या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. स्कीटमध्ये गावरान भूमिका कुशलनं मोठ्या खुबीनं साकारल्या आहेत. आता या सिनेमातही कुशलचा गावरान अंदाज रसिकांना कसा वाटतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कुशल ला त्याच्या या नवीन भूमिकेसाठी व चित्रपटाच्या यशासाठी अनेक शुबेच्छा.

Kushal in movie 03

Leave a Reply

Your email address will not be published.