Do you know what Pooja Sawant is afraid of ?

Pooja sawant Bus Stop 01

 

आपल्याला आवडणाऱ्या कलाकारांविषयी सगळी माहिती आपल्याला माहित असावी असा प्रत्येक फॅन ला वाटत असतं . हे कलाकार आपल्या खाजगी आयुष्यात कसे राहतात, काय खातात, कुठे फिरतात त्यांची प्रेम प्रकरणं हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता कायम चाहतेमंडळीना वाटत असते.

 

अशीच एक गंमतीशीर बातमी अभिनेत्री पूजा सावंत यांच्या चाहत्यांसाठी आहे. सध्या त्यांच्या ‘बसस्टॉप’ या चित्रपटाची चर्चा सगळीकडे होत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक गंमतीशीर किस्सा घडला होता. पूजा सावंतला पाण्याची खूप भीती वाटते . स्विमिंग पूल हा विषय आला कि ती प्रचंड घाबरते. ‘बसस्टॉप’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक आसा सीन होता ज्यामध्ये अनिकेत विश्वासरावला पाण्यात धक्का मारून तिला स्वतः पाण्यात उडी मारायची होती. या सीन साठी सर्व तयारी झाली व दिग्दर्शकांनी अॅक्शन म्हटले ठरल्याप्रमाणे पूजाने अनिकेतला पाण्यात ढकलले मात्र स्वतः पाण्यात उडी मारण्याऐवजी तिने चक्क पळच काढला. हे दृश्य पाहून संपूर्ण टीम हसू लागली. परंतु विशेष म्हणजे रिटेकमध्ये पूजाने हिम्मत करुन सीन पूर्ण केला.

 

या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अश्या अनेक गंमत झाल्यामुळे हा चित्रपट पाहताना तुम्हाला अतिशय आनंद होणार हे नक्की. या चित्रपटामध्ये पूजा आणि अनिकेतबरोबरच अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे हे कलाकार झळकणार आहेत. श्रेयश जाधव निर्मित आणि समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ‘बसस्टॉप’ २१ जुलैला प्रेक्षकांना आपल्या नजीकच्या सिनेमागृहात पाहता येणार आहेत. तोवर पहा या चित्रपटाचा ट्रेलर .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.