Kiran Karmarkar may divorce Rinku Dhawan

Rinku and Kiran 02 

 

लवकरचं टेलिव्हिजन विश्वातील आणखी एक जोडी विभक्त होण्याच्या मार्गावर आहे. हि जोडी आहे किरण करमरकर आणि अभिनेत्री रिंकू धवन . एकता कपूरच्या ‘कहानी घर घर की’ या प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. या मालिकेत त्यांनी भावंडांची भूमिका साकारली होती. त्यावेळी दोघांमधील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी २००२ मध्ये विवाह केला. या दोंघाच्या वैवाहिक आयुष्याला तब्बल १५ वर्षे झाली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ते लवकरच घटस्फोट घेत असून गेल्या वर्षभरापासून ते वेगळे राहत आहेत.

 

आपसातील वाद विवाद विकोपाला गेला असून यावर काही उपाय सुचत नसल्याने त्यांनी सामंजस्याने हा निर्णय घेतला आहे. किरण आणि रिंकूला हे समाजातील जवाबदार व्यक्ती असून मनात एकमेकांबद्दल कटुता बाळगून एकत्र राहण्यापेक्षा विभक्त होण्याचा मार्ग त्यांना योग्य वाटतो. या दोघांना हा निर्णय घेतला असला तरी त्यांना त्यांच्या लहान मुलाची चिंता आहे. रिंकू आणि किरण दोघांनाही या विषयी कसली हि चर्चा होणे मान्य नाही कारण लोकांमधील चर्चांचा मुलावर वाईट परिणाम होऊ शकतो.

 

Rinku and Kiran 03

 

किरणला आपल्याला नुकतेच ढाई किलो प्रेम या मालिकेत पाहायला मिळाले होते तर यह वादा रहा या मालिकेत रिंकू काम करत होती. पण काहीच महिन्यांपूर्वी तिने ही मालिका सोडली असून या मालिकेतील तिची भूमिका तिचीच बहीण अशित धवन साकारत आहे.