Jitendra Joshi’s experience of ‘Baghtos Kay Mujra Kar’

बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. जितेंद्र जोशी असे सांगतात कि, या चित्रपटाचा ट्रेलर पाहुन ,अनेक सत्ताधारी पक्षातील लोकांनी सांगतले कि गड किल्लांचे संवर्धन हे झालेच पाहीजे . व याचा परिणामस्वरूप औरंगाबाद मधील तीन किल्ल्यांना ११ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.

बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाचे चार दिवसाचे चित्रीकरण लंडनमध्ये झाले आहे . त्यावेळी तिथे एक किस्सा आसा घडला कि त्यांना तिथल्या एका म्युझिअम मध्ये चोरी झाल्याचा सीन चित्रीत करायचा होता. त्यासाठी त्यांनी परवानगी घेतली होती , व पोलिसांची गाडी यासाठी मागवायच्या होत्या पण जेव्हा तो सीन शूट करण्याची वेळ आली तेव्हा आम्हाला त्यांना असे सांगितले की .’इथे अशा प्रकारचा प्रसंग घडूच शकत नाही. त्यामुळे तुम्हाला असा सीन शूट करता येणार नाही.’
एक स्वतंत्र दिग्दर्शक म्हणुन हेमंत ढोमे यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. जितेंद्र जोशी असे सांगतात , कि या चित्रपटासाठी सर्वांनी झापाटून काम केले आहे. आणि ती स्फुर्ती आणि एनर्जी त्यासर्वांना हेमंतमुळेच मिळाली आहे.बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाचे संगीतकार अमितराज व आदर्श शिंदे तसेच आमचा कॅमेरामन मिलींद जोग, कल्याणी कुलकर्णी यांची कॉश्च्युमदेसायनिंग या सर्वांनीही आणि पॅशनेटली काम केले आहे. हेमंत ढोमे सोबत आणि या संपूर्ण टिमसोबतच काम जितेंद्रचा अविस्मरणीय अनुभव ठरला.

जितेंद्र आसा हि मत आहे कि सेलिबिटींनी त्यांच्या सेलिब्रिटीहूडचा वापर सामाजिक कार्यासाठी केला पाहिजे . कलाकारांनी सामाजिक कार्यासाठी नेहमी पुढे यावे असे त्याला वाटते.जेष्ठ कलाकार डॉ.श्रीराम लागू , निळु फुले यांनी बरेच सामाजिक काम केले आहे. पण त्यांच्याकाळी या सर्व गोष्टींना ग्लॅमर नव्हते. आणि हे कलाकार कधी त्याविषयी बोलतही नसायचे.
या चित्रपटाच्या निमित्ताने जितेंद्र त्याचे सेलिब्रिटी असण्याचा उपयोग गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी करणार आहे . तसेच हे काम फक्त चित्रपटापुरतेच मर्यादित नसून या नंतर देखील यासाठी योगदान देण्याची त्यांची इच्छा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.