Jitendra Joshi and Aamir Khan seen together

Jitendra Joshi and Aamir khan 01

जितेंद्र जोशी यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. तुकाराम, दुनियादारी यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू त्यांनी दाखवली आहे.चित्रपटात कोणतीही भूमिका असो गंभीर, विनोदी किंवा खलनायकी हि त्यांनी आपल्या अभिनयाची कसाब कायम दाखवली आहे .अतिशय ताकदीने कोणतीही भूमिका पेलणारा अष्टपैलू अभिनेता म्हणून त्याने त्याची ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच जितेंद्रने गीतकार म्हणूनही महारथी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. याचा उद्धरण म्हणजे कोंबडी पळाली…हे गाजलेले गाणे त्याने लिहिले आहे. कुठल्याही भूमिकेशी तो सहज एकरूप होतो अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. अनेक मराठी चित्रपटांमधून त्याने वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. तो उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे .

Jitendra Joshi and Aamir khan 02

​जितेंद्र जोशीने आमिर खानसोबतचा एक फोटो फेसबुक साइटवर पोस्ट केला असून या पेस्ट ची सगळीकडे चर्चा सुरु आहे .जितेंद्र आणि आमिर कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र आले.याची सगळ्यांना उत्सुकता आहे .आमिर आणि जितेंद्र चित्रपटात एकत्र झळकणार काअशी हि काहींना शंका आहे . या फोटो मुले अनेकांना आमिर आणि जितेंद्र कशासाठी एकत्र आले हा प्रश्न पडला आहे . सूत्राच्या माहिती नुसार आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनसाठी सध्या जितेंद्र काम करत आहे .
जितेंद्रने टाकलेल्या या पोस्टमध्ये त्याच्यासोबत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आहे. त्यांच्या या एकत्र फोटो मुले सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. या फोटोला तुफान आलंया… असे कॅप्शन त्याने लिहिले आहे. जितेंद्र आणि आमिरच्या या फोटोला भरभरून लाइक आणि कमेंट मिळाल्या आहेत.

Jitendra Joshi and Aamir khan 03

आमिर सध्या त्याच्या पाणी फाऊंडेशनच्या कामात व्यग्र आहे. याच कामा निमित्त त्याची आणि जितेंद्रची भेट झाली असल्याचे कळतेय.आमिर खानसोबत पाणी फाऊंडेशनचे काम जितेंद्र करत असण्याचे समजते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.