Jalu: upcoming movie on Women Empowerment

‘दुनियादारी’ चित्रपटानंतर तब्बल ४ वर्षांनी अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि संगीत दिग्दर्शक अमितराज ‘जळू’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. ‘जळू’ या चित्रपटाचा मुहूर्त काही दिवसांपूर्वी पार पडला. ‘जळू’ हि अजितकुमार धुळे आणि श्रीनिवास बिहाणी यांच्या ‘साई नक्षत्र प्रॉडक्शन’ निर्मिती आहे. चित्रपटाच्या मुहूर्ता ला अभिनेत्री वर्षा उसगावकर, रश्मी राजपूत, अभिनेते कमलेश सावंत, संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी उपस्थित होते.

Jalu Article 01

स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मूर्ती समजली जाते .आसा असला तरी आजच्या आधुनिक युगात स्त्री डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, वा आमदार अशा महत्वाच्या पदांवर काम करून पारंपरिकरित्या पुरूषप्रधान समजली जाणाऱ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. एकविसाव्या शतकातील स्त्रीने स्वत:ची शक्ती ओळखली आहे, असे म्हणे अगदी योग्य आहे.

Jalu Article 02

आपली कर्तबगारी जगाला दाखवून देण्यास आजची स्त्री सज्ज आहे. पण तरी अनेक सामाजिक आव्हानांचा तिला सामोरे जावे लागते हे दुर्दैवी गोष्ट आहे. आज हि आपल्या समाजात स्त्रीभ्रूण हत्या, लैंगिक शोषण, अॅसिड अटॅक या स्वरूपात स्त्री वर्गाला अत्याचार आपण होताना पाहतो.
‘जळू’ हा वास्तववादी चित्रपट बदलत्या समाजाबरोबर स्त्रियांना त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य, अधिकार, महत्वाकांक्षा, दृष्टिकोन यांची जाणीव करून देणारा आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे नक्की काय? महिला सक्षमीकरण व महिला सशक्तीकरण होणे ही काळाची गरज कशी आहे? यावर हा चित्रपट आधारित आहे.

Jalu Article 03

‘जळू’ या चित्रपटाचे निर्माते अजितकुमार धुळे असून या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शनदेखील त्यांचेच आहे. तसेच त्यांच्यासोबत निखिल भोसले या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. निखिल यांनी सीआयडी, आहट, कॉमेडी एक्सप्रेस यांसारख्या प्रसिद्ध मालिकांचे संकलन केले आहे. या चित्रपटातील गीतांना अमितराज यांनी संगीत दिले असून फुलवा खामकर नृत्यदिग्दर्शन करणार आहे. ‘जळू’ चित्रपटाची कथा अजितकुमार धुळे आणि सागिरा पटेल यांची असून पटकथा तेजस तुंगार यांनी लिहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.