Hrithik Roshan is happy to be a part of this Film

Hrithik Roshan hrudayantar article 03
मराठी सिनेमांच्या दमदार विषयांमुळे मराठी सिनेमाकडे आता बॉलिवूडचे कलाकारही आकर्षित होत आहेत. अनेकांना मराठी सिनेमात काम करण्याची उत्सुकता लागलेली बघायला मिळते. सलमान खान नंतर आता हृतिक रोशन मराठी सिनेमात भूमिका करणार आहे. त्याच्या या भूमिकेमुळे सध्या मराठी सिने इंडस्ट्रीत चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

काही दिवसांपूर्वी अभिनेता हृतिक रोशन याने त्याच्या या शूटींगचे काही फोटोदेखील ट्विटर व पोस्ट केले होते. विक्रम फडणीसच्या ‘हृदयांतर’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवणार आहेत. बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशनने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली.हृतिकने सोशल नेटवर्किंग साइटवरून ‘हृदयांतर’ (Hrudayantar) चित्रपटाच्या रिलीजची तारीख ९ जून २०१७ असल्याचं जाहीर केले.त्यासोबत त्याने ट्विट करताना म्हटले, “ मी ज्या सिनेमाचा हिस्सा आहे. त्या सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर करताना मला आनंद होतोय. ‘हृदयांतर’ हा चित्रपट माझा मित्र विक्रम फडणीसने दिग्दर्शित केला आहे”

Hrithik Roshan hrudayantar article 01
विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) निर्मित, आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित चित्रपट ‘हृदयांतर’. हृदयांतर सिनेमाची कथा हृदयस्पर्शी असून या सिनेमा सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुप्रसिद्ध अँकर मनिष पॉलदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. विक्रम प्रतिभावान व्यक्ती असून त्याच्या चित्रपटातून मराठीत पदार्पण करणे फारच आनंददायी असल्याचे पॉलने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले.

Hrithik Roshan hrudayantar article 02
निर्माता आणि दिग्दर्शक विक्रम फडणीस या चित्रपटविषय बोलताना म्हणाले के ते खूप उत्साहित आहेत. तसेच त्यांनी या चित्रपटावर गेली तीन वर्ष मेहेनत केली आहे. आता ९ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचणार असल्यामुळे त्यांना एका वेगळ्याच प्रकारचा आनंद व टेन्शन आहे.

 

‘हृदयांतर’ मुळे विक्रम फडणीस हा प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रथमच निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. विषेश म्हणजे त्याच्या याच चित्रपटासाठी म्हणून हिंदीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका, फराह खान व शामक दावर हे मराठी चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन करणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.