Heart touching teaser of Kaccha Limbu out now

Kaccha Limbu Teaser

नुकताच प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला. या चित्रपटाविषयी सगळ्यांना फार उत्सुकता आहे. तसेच या चित्रपटाच्या माध्यमाने रवी जाधव अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहेत. १ मिनीट २० सेकंदाच्या या टीझरमध्ये काटदरे कुटुंबियांच्या जगण्याचा अंदाज दाखवला आहे. टीझरमध्ये सोनाली कुलकर्णी एका गृहिणीच्या भूमिकेत दिसते व सचिन खेडेकर यांनी तिच्या साहेबांच्या भूमिकेत दिसत आहेत. शैला काटदरे हे सोनालीच्या चित्रपटातील पत्राचे नाव असून तिचा नवरा मोहन काटदरे हि भूमिका रवी जाधव यांनी साकारली आहे. त्यांचा मतीमंद मुलगा बच्चू हि व्यक्तिरेखा मनमीत पेम याने साकारली आहे.

 

सिनेमाचा अधिकतर भाग हा ब्लॅक अॅण्ड व्हाइटमध्ये चित्रीत करण्यात आलेला आहे. सिनेमाचा टीझर पाहताना काटदरे पती- पत्नीला करावी लागणारी तडजोड आणि तरीही त्यातही समाधानी असणारं हे कुटुंब नक्कीच अंर्तमुख करायला भाग पाडतं.प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा आहे.टीझरमध्ये सोनाली कुलकर्णी एका समंजस गृहिणी दिसत आहे तिचे साहेब म्हणजेच सचिन खेडेकर तिच्या वाढदिवसानिमित्त खास केक घेऊन येतात. ती तो केक अतिशय उत्साहाने घरी नेऊन नवऱ्याला दाखवते. मधेच त्यांचा मतीमंद मुलगा बच्चू येऊन वडिलांना ढकलून अतिशय अक्राळपद्धतीने तो केक खाऊन घेतो. अस्ताव्यस्त पडलेला केक पाहून ती थोडी निराश होते व तिला तिच्या साहेबानी सांगीतल्याप्रमाणे त्या केक वर सुंदर दोन पक्षी होते का असे तिच्या नवऱ्याला विचारते.

 

हा भेदक टीझर पूर्णपणे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. मागच्या वर्षी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले होते. या चित्रपटच्या कथे विषयी अधिक माहिती सध्या प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. पण टीझरमुळे या चित्रपटाविषयी थोडा अंदाज नक्कीच तुम्हाला आला असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांमध्ये या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात येईल आणि त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा विषय नक्कीच अधिक स्पष्टपाणे कळेल तोपर्यंत पहा हा हृदयस्पर्शी टीझर ..

 

Leave a Reply

Your email address will not be published.