Govind Nihalani’s debut in Marathi film industry by ‘Ti Ani Itar’

बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक गोविंद निहलानी ‘ती आणि इतर’ चित्रपटाच्या माध्यमाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. नुकताच त्यांच्या या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. या पोस्टरकडे पाहता हा चित्रपट स्रियांविषयी व त्यांच्या समस्यांविषयी बाश्या करणारा असेल असे समजते. तसेच सायलेन्स इज नॉट ऍन ऑप्शन अर्थात शांत बसणं हा काही पर्याय नाही हि टॅगलाईन चित्रपटाची कथा भेदक असल्याचे प्रकाशाने दाखवत आहे.

 

  Ti Ani Itar 02 

 

दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी या आधी जुनून, आक्रोश, अर्धसत्य, दृष्टी, अशा अनेक आशयघन चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या शिवाय त्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे अनेक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. गोविंद निहलानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक असून त्यांना बॉलीवूड मध्ये विशेष स्थान आहे.

 

Ti ani Itar 04

 

‘ती आणि इतर’ या त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, आविष्कार दार्व्हेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे, सुमन पटेल या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या आधीहि सोनाली कुलकर्णी यांनी गोविंद निहलानी यांच्याबरोबर काम केले आहे त्यावेळी ते कॅमेरामन होते. ‘ती आणि इतर’ या चित्रपटाच्या माध्यमाने ‘स्त्री’ समस्यांवर भाष्य केले जाणार आहे. या आधी अनेक वास्तववादी विषय अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने हाताळणारे दिग्दर्शक गोविंद निहलानी यांची हि पहिली मराठी कलाकृती मराठी प्रेक्षकांनसाठी खूप मनोरंजक ठरणार आहे.

 

Ti ani Itar 03

 

सुप्रसिद्ध लेखिका मंजुळा पद्मनाभन यांच्या इंग्रजी नाटक ‘लाईटस् आऊट’ यावर हा चित्रपट आधारित आहे . या सिनेमाची पटकथा-संवाद शांता गोखले यांनी लिहिले आहेत. तसेच चित्रपटाची संगीत रचना वसुदा शर्मा यांचे असून या चित्रपटाचे गीतकार मंदार चोळकर आहेत . या चित्रपटाचे असून संकलन प्रदीप प्रभाकर पांचाळ यांनी केले आहे. सचिन पिळगावकर यांचे या चित्रपटात विशेष योगदान आहे. हिमांशू ठाकूर प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते प्रकाश तिवारी, पुनीत सिंह, दयाल निहालानी आणि धनंजय सिंह आहेत.

 

Ti ani Itar 01

 

येत्या २१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.