Gashmeer Mahajani will celebrate annual function of his Dance Academy in Pune

Gashmeer mahajani dance school 01

 

 

हिंदी चित्रपटसृष्टी असो कि मराठी आपल्याला आता मोठ्या मोठ्या प्रयोजकांना पाहायची सवय झाली आहे. आपण आता प्रयोजकांशिवाय एखाद्या कार्यक्रमाची कल्पनाच करू शकत नाही. ह्या अशा दिवसांमध्ये एक असा अभिनेता आहे जो आपल्या डान्स अकादमी च्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन कोणत्याही आयोजकांची मद्त न घेता स्वतःच करणार आहे. असा हा अभिनेता आहे गश्मीर महाजनी. गश्मीर ने देऊळ बंद ह्या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टी मध्ये पदार्पण केले त्या सोबतच त्याने आपली स्वतःची डान्स आणि मार्शल आर्ट्स ची अकादमी सुरु केली आणि गेल्या सातरावर्षांपासून तो आपल्या अकादमी चे संमेलन भरवत आला आहे ते हि आयोजकांची मदत न घेता.

गश्मीर आपल्या कार्यक्रमाची तयारी स्वतःच करतो अगदी त्याच्या विद्यार्थ्यांच्या कॉस्च्युम्सपर्यंत त्याचे विद्यार्थी कार्यक्रमासाठी एकमेकांना मेकअप करायला मदत करतात त्यामुळे आयोजक नसले तरी त्यांना कुठेही प्रॉब्लेम होत नाही. आयोजक न घेण्यामागचा त्याच्या भूमिकेबद्दल त्याला विचारले असता तो असे सांगतो कि आयोजक नसल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची बंधने नसतात आणि त्यामुळे कोणत्याही सेलेब्रिटीजशिवाय त्याला आपला कार्यक्रम करता येतो ह्यामागे त्याच्या विद्यार्थ्यांना प्रकाशझोतात मध्ये आणणे हि तो आपली पहिली जबाबदारी समजतो. कार्यक्रमाच्या तयारीसाठी त्याचे विद्यार्थी १५-२० दिवस त्याच्याच घरी राहून तयारी करतात.गश्मीर ह्या कार्यक्रमाला ८-१० लाख रुपये खर्च करतो.

गश्मीर च्या कार्यक्रमाचे हे १७ वे वर्ष आहे यंदा त्याचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाट्यगृह पुणे येथे २१ जुलै ला होणार आहे. हा दिवस त्याच्यासाठी आणि त्याच्या विद्यार्थ्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो म्हणूनच अशा कार्यक्रमामध्ये बाहेरचे सेलेब्रेटी बोलावून त्याला त्याच्या विद्यार्थ्यांचा आनंद हिरावून घ्यायचा नसतो. सेलिब्रिटींना बोलावून पैसे कमावण्यापेक्षा आपल्या विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करून देणे हि तो आपली नैतिक जबाबदारी समजतो.