Father’s Day Special: responsible fathers of Marathi Film Industry

अलिकडे ‘डे’ नावाच्या संस्कृतीने मानवी जीवनात चांगलाच शिरकाव केलेला आहे. फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या मायावी दुनियेत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जगभरातील तरूण आज कुठल्या ना कुठल्या ‘डे’ची वाट पाहत असतात. दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जगभरात ‘फादर्स डे’चे आयोजन करण्यात येते.

 

 

फादर्स डे…आपल्या वडिलांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. हा दिवस सादरा करण्याची सुरुवात अमेरिकेत 1924 साली झाली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती कॉलविन कॉलिडस यांनी दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याची घोषणा केली.

 

 

बाबा आणि पाल्याचे हे नाते जरा काहीसे वेगळेच असते. अनेकजण त्यांच्या त्यांच्या पध्दतीने आपले बाबांच्या प्रती असलेले प्रेम व्यक्त करत असते. तरी देखील फादर्स डेच्या निमित्ताने काहीतरी वेगळं, भन्नाट करायचं अशा कल्पना नक्कीच आपल्या मनात येतात. खरंतर अशा दिवशी आपले मन जरा जास्त क्रिएटिव्ह बनते. प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा हिरो नंबर एक असतो आणि मुलासाठी मित्राच्या रुपातून मार्गदर्शक असतो.

 

 

वडिलांच्या प्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी जरी हा दिवस असला, तरी जगातले तमाम वडील मात्र आपल्या मुलांबद्दलचं त्यांचं प्रेम प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त करत असतात. वडिलांच्या या प्रेमाला ना जातीपातींचं बंधन असतं, श्रीमंती-गरिबीचे नियम. हे प्रेम आपल्याला अगदी सहज कुठेही दिसू शकतं. ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील काही बाबांची विशेष छायाचित्रं.

Fathers Day Ankush Choudhari

Page 1 of 13

Fathers Day Ankush Choudhari

Page 1 of 13

 

Leave a Reply

Your email address will not be published.