Exclusive Photos : Aroh Welankar and Ankita shingvi’s wedding album

Aroh wedding album 02

‘रेगे’ फेम अभिनेता आरोह वेलणकर व अकिंता शिंगवीसह हे 11 डिसेंबरला विवाबबंधनात अडकले.महाबळेश्वरमध्ये आरोह आणि अंकिताने डेस्टिनेशन वेडिंग केले. आरोह हा मराठी असून अंकिता मारवाडी आहे. या कारणामुळे त्यांचे लग्न मारवाडी पद्धतीने पार पडले. आरोह आणि अंकिता यांच्या दिमाखदार विवाह सोहळ्यात कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह मित्र-मैत्रिणींनी उपस्थित होते. त्यांनी केलीली मौज मज्जा व लग्नातील धम्माल मस्ती त्यांच्या लग्नातील फोटोमध्ये दिसत आहे. आरोहने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर हे फोटो पोस्ट केले व त्याच्या फॅन्स ने या दोघांवर शुभेच्छांचा पाऊस पडला. लग्नानंतर यांचे रिसेप्शन मुंबई आणि पुणे याठिकाणी झाले.अंकिता हि मूळची पुण्याची असून तिचा चित्रपटसृष्टीशी काही संबंध नाही.

 

आरोह एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तो इंजीनिअरसुद्धा आहे. त्याने त्याच्या लग्नासाठी एक खास मोबाईल अॅपही तयार केले होते.आरोह वेड्स अंकिता या अॅपद्वारे लग्नात घडणा-या प्रत्येक गोष्टीचे अपडेट पाहुण्यांना मिळणार होता. आज काल प्री-वेडिंग फोटोशूट करण्याचे फॅशन आहे . ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यासारख्या विविध सिनेमांच्या सेटवर आरोह आणि अंकिताचे प्री-वेडिंग फोटोशूट झाला. या फोटोमधून या दोघांची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळाली.

 

जिकडेतिकडे सध्या लगीनघाई सुरु आहे. विशेष म्हणजे सेलिब्रिटी मंडळींमध्ये जरा जास्तच लगीनघाई आहे असा दिसून येत आहे .गेल्या काही दिवसात चित्रपटसृष्टीतील विविध कलाकार लग्नबंधनात अडकले. आरोह वेलणकर याच बरोबर प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहन गुजर, सागरिका घाटगे अशी सिनेसृष्टीतील विविध कलाकार विवाह बंधनात अडकले. पहा आरोह च्या लग्नातील काही खास क्षण.

Aroh wedding album 01

 

Aroh wedding album 03

 

Aroh wedding album 04

 

Aroh wedding album 05

 

Aroh wedding album 06

 

Aroh wedding album 07

 

Aroh wedding album 08

 

Aroh wedding album 09

 

Aroh wedding album 10

 

Aroh wedding album 11

 

Aroh wedding album 12

 

Aroh wedding album 13

 

Aroh wedding album 14

 

Aroh wedding album 15