Competition between Akash Thosar and Amey Wagh

FU VS Muramba 01 ‘सैराट’ या चित्रपटामधून मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला सुपरहिरो आकाश ठोसर लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एफयु’ या चित्रपटाने पुन्हा एकदा त्याच्या चात्यांना भेटणार आहे. गेल्याच वर्षी ‘सैराट’ या सिनेमातून आकाशने संपूर्ण महाराष्ट्रभर वेड लावले होते. यावर्षी प्रदर्शित झालेल्या महेश मांजरेकर यांच्या ‘ध्यानीमनी’ चित्रपटासाठी अमिताभ बच्चन आणि सलमान खान या बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आकाश च्या ‘एफयु’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे.सलमान खानने नुकताच त्याच्या ट्विटर अकाउंट वरून या चित्रपटाचे मोशन पोस्टर व तारिख घोषित केले. स्वतः सलमान या चित्रपटाची माहितीत देत असल्यामुळे या चित्रपटाच्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहेत. सलमानने ट्विटरवर ‘एफयु’ मधील गाण्याविषयी ट्विट केले व महेश मांजरेकर यांचं कौतुक केलं आहे.

 

दुसरीकडे ‘मुरांबा’ या अमेय वाघच्या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. रंजीत गुगले यांनी सोशल मिडियावर ‘मुरंबा’ या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.दशमी स्टुडियोज यांच्या ‘घंटा’ या चित्रपटाच्या यशानंतर ‘मुरांबा’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तसेच हयुज प्रॉडक्शन्स, प्रतिसाद प्रॉडक्शन्स यांची प्रस्तुत असलेला ‘मुरंबा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूत्रांच्या माहिती नुसार अमेय वाघचा दमदार अभिनय आणि खऱ्या आयुष्यातील समजली जाणारी त्याची प्रेयसी मिथीला या चित्रपटात एकत्र असल्यामुळे या चित्रपटाविषयी पेरक्षकां उत्सुकता आहे हे नक्की.

 

अमेय आणि आकाश दोघांचा हि फॅन क्लब प्रचंड मोठा आहे. 2 जूनला मुरांबा आणि एफ यू हे बहुप्रतिक्षित दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे त्याचा फटका बॉक्स ऑफिसवर बसेल की काय याची शंका आहे. सध्या वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला मराठी चित्रपट बनताना दिसत आहेत .कथा, पटकथा, संवाद, सिनेमॅटोग्राफी याविषयी प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

FU VS Muramba 02

त्यामुळे ‘एफयु’ कि ‘मुरांबा’ यापैकी कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळते ते आपल्याला 2 जून नंतरच समजणार ..

Leave a Reply

Your email address will not be published.