Chinmay Udgirkar to be seen in this movie

Chinmay Udgir in gulabjaam 03
नुकताच सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट गुलाबजाम ची घोषणा सोशल मीडिया वर करण्यात आली. या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाली आहे. आमच्या रेसिपीला सुरूवात झाली असे कॅप्शन करत या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन कुंदलकर आहेत . प्रिया बापट आणि साई ताम्हणकर यांचा गाजलेला चित्रपट वजनदार हा त्यांनी दिग्दर्शित केला होता.
या चित्रपटाच्या पोस्टरवरून सोनाली आणि सिद्धार्थ हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत असे समजते. या चित्रपटातील त्यांची भूमिका नक्की काय असणार आहे? हे मात्र आजून स्पष्ट झालेलं नाही.तसेच या दोघांशिवाय आणखी कोण कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत हे देखील गुप्त ठेवण्यात आले आहे.
Chinmay Udgir in gulabjaam 01
सूत्रांच्या माहिती नुसार चिन्मय उद्गिरकर आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे . ‘स्वप्नाच्या पलीकडे’ या मालिकेमुळे चिन्मय उद्गिरकर हे नाव घराघरात पोहोचले. काही दिवसं पूर्वी नांदा सौख्यभरे या मालिकेत प्रेक्षकांना दिसला होता. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे व अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. चिन्मय गुलाबजाम या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे असे म्हटले जात आहे. सोनाली कुलकर्णी हिने तिच्या ट्विटर या सोशल नेटवर्किंग अकाउंट वर एक फोटो पोस्ट करून चिन्मयच्या फॅन्सना हि गोष्ट कळवली. सोनालीने तिच्या ट्वीटमध्ये असे ही म्हटले आहे की, गुलाबजामचे पुण्यात भल्या पहाटे शूट सुरू आहे.
या चित्रपटाच्या शूटिंग वेळी अमृततुल्य चहा या हॉटेल मध्ये दिग्दर्शक सचिन कुंदलकर आणि सहकलाकार चिन्मय उद्गिर यांच्या सोबत ती दिसत आहे.
यावरूनच चिन्मय या चित्रपटात असल्याचे त्याच्या चाहत्यांना कळले परंतु त्याची भूमिका नक्की काय असणार आहे हे मात्र अद्याप समजलेले नाही .

Chinmay Udgir in gulabjaam 02

Leave a Reply

Your email address will not be published.