Boyz poster launch held at JSPM college Pune

Boyz 03

गेल्या काही दिवसांपासून ‘बॉईज’ या चित्रपटाच्या पोस्टरविषयी चर्चा सुरु आहे. या पोस्टर वर उभी असलेली तीन पाठमोरी मुलं नक्की कोण ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या गोष्टीचा खुलासा पुण्याच्या जेएसपीएम कॉलेजमध्ये नुकताच झाला. बॉईज या चित्रपटाचा पोस्टर लाँच कार्यक्रम पुण्याच्या जेएसपीएम कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता. या वेळी तीन मुले म्हणजेच पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड हि ती तीन मुलं असून या समारंभावेळी यांना प्रेक्षकांसमोर आण्यात आले. या तिघांनी मिळून सर्वांचा भरपूर मनोरंजन केले तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांना पूर्णपणे साथ दिली. या चित्रपटातील ‘जीवना…’ हे गाणे या वेळी सादर करण्यात आले.

Boyz 01

 

स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांच्या परफॉर्मन्स मुळे जेएसपीएमच्या विद्यार्थ्यांना भरपूर आनंद मिळाला. ‘जीवना…’ हे गाणे दोन व्हर्जन मध्ये असून ,जे गाणे सर्वात जास्त लोकांना आवडेल तेच गाणे सिनेमात दाखवले जाईल अशी घोषणा या वेळी करण्यात आली. या वेळी तसेच पार्थ, सुमंत आणि प्रतिक यांनी या गाण्यावर डान्स परफॉर्मन्स सादर केला.

 

Boyz 02

स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातील ‘बॉईज’ चित्रपटातील जीवना…’ हे गाणे वैभव जोशी यांनी लिहिले असून अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.  अभिनेता पार्थ भालेराव यांनी या आधीही अनेक मराठी चित्रपट केले आहेत. अभिनेता सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड यांचा हा पहिला चित्रपट आहे. किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाची निर्मिती, सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर आहेत. अवधुत गुप्ते या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच प्रस्तुतकर्त्याची भूमिका पेलणार आहेत.

 

बॉईज या चित्रपटाने सोशल साईट्स वर प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळवली आहे त्याच प्रमाणे या पोस्टर प्रदर्शन सोहोळ्यात तरुणाईच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. येणाऱ्या यूथ फेस्टिवल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.