Bollywood superstar Ranveer Singh launched the teaser poster of this Marathi movie

Bhikari poster launched 03

‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ या चित्रपटाच्या चर्चा बऱ्याच दिवसं पासून रंगात आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या हस्ते करण्यात आला होता. या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य हे आहेत. तसेच मी मराठा एंटरटेंटमेंटचे शरद देवराम शेलार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

 

 

नुकताच या चित्रपटाचे टीजर पोस्टर हे बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंग यांनी रेलिझ केले. रणवीर सिंग यांनी त्यांच्या ट्विटर वरून या चित्रपटाचे पहिले टीजर पोस्टर प्रेक्षकांसमोर आणले. या सोबतच त्यांनी या चित्रपटाच्या टीम ला शुभेच्छा दिल्या.या चित्रपटाचे पोस्टर पाहता सुटबुटमध्ये असलेला एक मनुष्य तोंडावर छत्री घेऊन झोपलेला दिसत आहे. या माणसाच्या शेजारी भिकारीचं वाडगं दिसत आहे. स्वप्नील जोशी हा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असल्यामुळे हे व्यक्ती म्हणजे स्वप्नील असेल असे बोले जात आहे. स्वप्नीलची नक्की भूमिका कशी असणार आहे या बाबत जास्त माहिती सध्या प्रसिद्ध केले गेली नाही.

 

Bhikari poster launched 02

या आधी गणेश आचार्य यांनी काही हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे परंतु मराठीत दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तसेच गीत गुरु ठाकूर यांचे असून, त्यांनी यात अभिनय देखील केला आहे. आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर आधारित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटामध्ये रुचा इनामदार, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काबरा अशी उत्तम स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 

 

या चित्रपटातील ‘गजानना’ या गाण्यामध्ये एक हजार कलाकारांचा सहभाग आहे. या चित्रपटाचे छायाचित्रकार महेश लिमये असून त्यांच्या मते हे गाणे राठी गाण्यांच्या चित्रीकरणात ते ‘सुपरसॉंग’ ठरेल असे आहे.

Bhikari poster launched 01

Leave a Reply

Your email address will not be published.