Bollywood and other industry celebrities desire to work in Marathi movies

aa ba ka movie article 02

मराठी चित्रपटानं मिळत असलेल्या यशामुळे सध्या सर्व लोक मराठी चित्रपट सृष्टी कडे आकर्षित झाले आहेत. सैराट चित्रपटाच्या अभूतपूर्व यश नंतर सर्व कलाकरांना मराठीत चित्रपटात सृष्टीत काम करावा अशी उत्कंठा निर्माणझाली आहे . अनेक बॉलिवूड सेलेब्रिटीएस ने मराठीचित्रपट निर्मिती केले आहे व ते काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. याच बरोबर अनेक बॉलिवूड कलाकारांनी आम्हाला मराठीत काम करायला आवडेल असे आवर्जून मुलखांतीमध्ये सांगतले आहे.

 

आगामी चित्रपट ‘अ ब क’ या यामध्ये बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांची हि इच्छा पूर्ण होणार आहे.’अ ब क’ या चित्रपटात बॉलिवूडमधील अनेक चेहरे दिसणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘अ ब क’ या मराठी चित्रपटात सनी पवार, नवाजुद्दीन सिद्दकी, तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी, तन्वी सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला ज्यामध्ये अमृता फडणवीस आणि सुनील शेट्टी हे सेलिब्रिटी उपस्थित होते. एकाच वेळी मराठी,हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, अशा पाच भाषेत निर्माण होणार हा चित्रपट सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. अमृता फडणवीस यांनी या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. नुकताच त्यांनी गायलेले व सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या सोबत ऑनस्क्रीन काम केलेल्या विडिओ सॉंग सोशल नेटवर्किंग साईटवर गाजत आहे.

Marathi movie aa ba ka 01

 

‘अ ब क’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकुमार शेडगे करणार असून मिहीर कुलकर्णी या चित्रपटाचे निर्माते आहेत.राहुल रानडे यांनी या चित्रपटाचे सांगीत दिग्दर्शन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ ऑगस्ट पासून या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु होणार आहे. मुला-मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींना सुद्धा दर्जात्मक शिक्षण देणे गरजेचे आहे या विषयावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.