Journey of Bhau Kadam The King of Comedy

१९७२ सालच्या १२ जूनला भालचंद्र उर्फ भाऊ कदम यांचा जन्म झाला. “फु बाई फु” तसेच “चला हवा येउ द्या” या दोन कार्यक्रमांनी भाऊंना त्यांची विशेष ओळख मिळवून दिली. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या विनोदी शैलीमुळे भाऊंनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

 

Bhau Kadam BD special 01

 

भाऊ कदम याचे बालपण मुंबईतील वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये गेले आहे. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे आहेत. वडिलांच्या अकाली निधनानंतर वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. भाऊ, घर खर्चासाठी मतदार नावे नोंदणीचे काम करत होते, पण त्यात भागत नसल्याने त्यांनी भावाच्या साथीने पानाची टपरी सुरू केली.

 

पंधरा वर्षांत भाऊ यांनी जवळजवळ ५०० नाटकांमध्ये अभिनय केला. खरं तर करिअरमध्ये मोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता. मात्र त्याचकाळात विजय निकम यांनी त्यांना ‘जाऊ तिथे खाऊ’ या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरले.

 

 

Bhau Kadam BD special 02

 

भाऊ नाटकांमध्ये काम करत असल्याने त्यांच्याबद्दल इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांना माहित होते. त्यांच्यापैकी काहींनी त्यांचे नाव ‘फू बाई फू’साठी सुचवले. मात्र सलग दोनदा भाऊंनी ‘फू बाई फू’ची ऑफर नाकारली. लाजाळू स्वभावाच्या भाऊंना मला हे काम जमणार नाही, असे वाटायचे. मात्र तिसऱ्यांदा आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली आणि संधीचे सोने केले. ‘फू बाई फू’च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले.

 

“टाईमपास” “नारबाची वाडी” “मिस मॅच” “मस्त चाललंय आमचं” “पुणे व्हाया बिहार” “झाला बोभाटा” “वाजलाच पाहिजे” “हाफ तिकीट” “जाऊ द्याना बाळासाहेब” यांसारख्या अनेक हिट सिनेमांमध्ये आपण त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू पहिले आहेत.