Bhau Kadam’s upcoming movie ‘Jaga Vegali Antayatra’

Jagavegli Antayatra02

 

आपले लाडके भाऊ कदम लवकरच ‘जगावेगळी अंतयात्रा’ घेऊन आपल्या भेटीसाठी येत आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले भाऊ कदम या चिरटपतात काय धमाल करणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ‘जगावेगळी अंतयात्रा’ हा चित्रपट एका नाविन्यपूर्ण विषयाला धरून तयार करण्यात आला आहे. भाऊ कदम या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. आजच्या तरुण पिढीसमोर भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे नोकरी. यातच उच्चशिक्षित तरुणांपुढे जर हा प्रसंग आला तर ते कोणत्यापद्धीतीने तो सॊडवतात व इतरांपुढे काय आदर्श घालून ठेवतात ही गंमत या चित्रपटात विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे.

 

Jagavegli Antayatra01

 

 

अल्टीमेट फिल्म मेकर्स बॅनरखाली डॉ .नितीन श्याम तोष्णीवाल निर्मित ‘जगावेगळी अंतयात्रा’ हा चित्रपट अमोल लहांडे यांनी दिग्दर्शित केला आहे . या चित्रपटात भाऊ कदम, माधव अभ्यंकर ,राजन भिसे ,सुहास परांजपे या दिग्गज कलावंताबरोबरच सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित , विनम्र भाबल, डॉ.विशाल गोरे आणि शिवानी भोसले या नवोदित कलावंतांचाही समावेश आहे. गंभीर विषयाला विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटत केला गेला आहे. हसता हसता एका महत्वाच्या समस्येबाबतही हा चित्रपट विचार करायला प्रवृत्त करणारा असल्याचे दिग्दर्शक अमोल लहांडे यांनी सांगितले.

 

 

रोहन-रोहन या संगीतकार जोडीने या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले आहे. तसेच सिध्दार्थ महादेवन ,महालक्ष्मी अय्यर ,वैशाली सामंत, सुरेश वाडकर यांसारख्या दिग्गज गायकांचा सुमधूर आवाज या गाण्यांना लाभला आहे. मराठीत एक नवीन विषय,व त्याला साजेशे कलावंत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ‘जगावेगळी अंतयात्रा’ येत्या २३ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.