Bhau Kadam soon to be seen in this upcoming movie

Nashibvan 01

 

‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेते भाऊ कदम लवकरच ‘नशीबवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहेत.भाऊ कदम अर्थात भालचंद्र कदम हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . या मुले त्यांच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता आहे . विविध राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे सिनेमॅटोग्राफर अमोल वसंत गोळे हे या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. तसेच कथा – पटकथा – संवाद आणि सिनेमॅटोग्राफी या जबाबदाऱ्याही त्यांनीच पार पाडल्यात. ‘नशीबवान’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

‘नशीबवान’ या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता भाऊ कदम यांची प्रमुख भूमिका आहे. फ्लाईंग गॉड फिल्मस् प्रस्तुत ‘नशीबवान’ चित्रपटाचे निर्माते अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड, महेंद्र गंगाधर पाटील आहेत. प्रशांत विजय मयेकर यांनी सह निर्मती केली आहे. .

गोळे यांची निर्मिती असलेल्या ‘रंगा पतंगा’ या चित्रपटाला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार, पिफ (२०१६) मध्ये संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर त्यांच्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाला पिफ (२०१५)मध्ये संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि गोळे यांना बेस्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांनी सिनेमॅटोग्राफी केलेल्या ‘हा भारत माझा’ला ‘पिफ’मध्ये संत तुकाराम पुरस्काराने गौरविण्यात आलंय. ११ ते १८ जानेवारी दरम्यान संपन्न होत असलेल्या यंदाच्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (पिफ) च्या स्पर्धा विभागात या चित्रपटाची निवड झालीय.