Bharat Jadhav celebrated world environment day in Kolhapur

Bharat Jadhav 01

भरत जाधव हा मराठी नाटक आणि चित्रपटामधला सुप्रसिद्ध कलाकार (अभिनेता) आहे. व्यावसायिक मराठी चित्रपटांमुळे भरतला एक विनोदी कलाकार म्हणून मान्यता मिळाली. त्याचा ह्या प्रकारच्या सिनेमांचा आणि नाटकांचा मोठा चाहता वर्ग आहे. “सही रे सही” हे नाटक आजवरच्या मराठी नाटकांमधल्या सर्वात यशस्वी नाटकांपैकी एक आहे. “श्रीमंत दामोदर पंत”, “ऑल द बेस्ट”, आणि “आमच्यासारखे आम्हीच” ही त्याची इतर प्रसिद्ध नाटके.

 

 

त्याने आपली कारकीर्दीची सुरुवात शाहीर साबळेंच्या मार्गदर्शनाखाली १९८५मधे केली. भरतला जत्रा चित्रपटातील “कोंबडी पळ।ली ” ह्या गाण्यावरील नृत्यासाठी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Bharat Jadhav 02

अभिनेता भरत जाधव हे नेहमीच सामाजिक भान असणारे व सामाजिकता जपणारे कलाकार समजले जातात . ५ जून या जागतिक पर्यावरण दिना निमित्त त्याने विशेष रित्या साजरा केला. अनेक ठिकाणी यादिवशी पर्यावरणाचे महत्त्व सांगणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्याचा प्रमाणे या दिवसाचं महत्त्व जाणून भरतनेही हा दिवस अतिशय उत्तम पद्धतीने साजरा केला.

 
भरत हा मूळचा कोल्हापुरचा आहे. जागतिक पर्यावरण दिना निमित्त त्याने कोल्हापुरात हजेरी लावली होती.कोल्हापुरा येथे आयोजित करण्यात एका कार्यक्रमात त्याने सहभाग . इतकाच नाही तर घराघरात जाऊन त्याच्या शेजाऱ्यांना रोप वाटप केले. फक्त त्याने रोपांचं वाटपच केले नाही तर त्या रोपाचे जतन आणि संवर्धन करण्याची विनंतीही केली.

Leave a Reply

Your email address will not be published.