‘Bhagwat Geeta’ upcoming film starring Shashank Ketkar

 Bhagwat Geeta 02 

होणार ‘सून मी या घरची’ या झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर छोट्या पडद्यावर य़श मिळाल्यानंतर मोठ्या पडद्याकडे वळला आहे.‘होणार सून मी ह्या घरची’ आणि झी युवा वरील ‘इथेच टाका तंबू’ या मालिकेतून अभिनेता शशांक केतकरने भरपूर प्रसिद्धी मिळवली होती. त्यांच्या उत्तम अभिनयामुळे त्याने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्या नंतर आपण त्याला नाटक आणि सिनेमांच्या माध्यमांतून प्रेक्षकानचं मनोरंजन करताना पाहिलं. ‘वन वन वे तिकिट या चित्रपटात काम केल्यानंतर आता तो पुन्हा एकदा एका चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात तो प्रमुख भूमिका साकारणार आहे.

 

Bhagwat Geeta 01

 

‘भगवत गीता’ असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे पोस्टर सोशल नेटवर्किंग साईट च्या माध्यमाने प्रदर्शित केले. या पोस्टर मध्ये प्यार कभी एक तरफा नही होता, पार्सल, आठवण, पनवती, फोन, प्रेम, विद्या कृष्ण वासुदेव असे वेगवेगळी शब्द लिहिलेली दिसतात.या पोस्टरवर दोन अपूर्ण चेहेरे दिसत आहेत . एक चेहरा शशांक चा वाटत असून दुसरा चेहरा कोणाचा ? हा प्रश्न सगळ्यांचं पडला आहे. या पोस्ट नंतर त्याने त्याच्या चाहत्यांना हि अभिनेत्री कोण असावी हे ओळखण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच या पोस्टरमध्ये नायक-नायिकेशिवाय एक कुरियरची गाडी दिसत आहे.

 

Bhagwat Geeta 03

 

‘भगवत गीता’ या चित्रपटाचे निर्माते भारत जोशी असून लेखन आणि दिग्दर्शन अंकुर अरुण काकतकर यांनी केले आहे. शशांक केतकरला आणि या संपूर्ण टीम ला या आगामी चित्रपटासाठी अनेक शुभेच्छा .

Leave a Reply

Your email address will not be published.